Beed Crme | पैसे खाली पडल्याचा बहाणा करुन शिक्षकाच्या दुचाकीला अडविलेली दीड लाखाची रोकड असलेली बॅग लांबविली

भरदिवसा झालेल्या चोरीमुळे भितीचे वातावरण, दोघा तिघा चोरट्यांच्या टोळीकडून कृत्‍य
Nashik Crime
Beed Crme | पैसे खाली पडल्याचा बहाणा करुन शिक्षकाच्या दुचाकीला अडविलेली दीड लाखाची रोकड असलेली बॅग लांबविलीFile Photo
Published on
Updated on

केज :- बँकेतून पैसे काढून ते एका टिफीन बॅग मध्ये ठेवून ती बॅग मोटार सायकलीच्या हँडलला अडकवून घरी जात असलेल्या एका शिक्षकाला अनोळखी व्यक्तीने पैसे खाली पडल्याचे सांगून ते खाली उतरताच पाठीमागून आलेल्या अनोळखी इसमाने मोटार सायकलीला अडकवलेली १ लाख ५५ हजार रु. ची बॅग पळवून नेली आहे. भरदिवसा झालेल्या चोरीमुळे लोकांच्या मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

केज येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथील शिक्षक गोविंद दादासाहेब गायकवाड (रा. युसुफवडगाव ता. केज, ह.मु. विठाईपुरम कळंब रोड केज) यांच्या गावाकडे त्यांच्या शेतात विहिरीचे बांधकाम सुरू असल्याने त्यांनी दि. ७ मे रोजी सकाळी त्यांनी राजर्षी शाहु अर्बन बँक येथून १ लाख ५ हजार रु. काढले व ते त्यांच्या जवळ असलेल्या एका टिफीन बॅग मध्ये ठेवले त्या नंतर त्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक भवानी चौक येथ बँकेतून ५० हजार रु. काढले आणि ते सुद्धा त्या टिफीन बॅग मध्ये ठेवले. तसेच पुन्हा त्यांनी भवानी चौकातील पेट्रोल पंपा शेजारी असलेल्या एटीएम मधून ४० हजार रु.काढले आणि ते पँटच्या खिशात ठेवले.

१ लाख ५५ हजार रु. ठेवलेली पैशाची टिफीन बॅग त्यांनी त्यांच्या मोटार सायकलच्या हँडलला अटडकवुन घरी जात असताना ११:४५ वा. सुमारास ते रुबाब नावाच्या रेडीमेड कपड्याच्या दुकाना समोर आल्या नंतर त्यांच्या पाठी मागुन येत असलेल्या मोटार सायकलवर येणाऱ्या दोन व्यक्तीनी त्यांना आवाज देवुन सांगितले की, तुमचे पैस खाली पडले आहेत. असे सांगितल्याने दादासाहेब गायकवाड हे मोटार सायकल परत वळवुन थांबले.

तेव्हा तेथुन मोटार सायकलवरुन जात असलेल्या एका तिसऱ्या व्यक्तिने त्यांना सांगितले तेथे बाजुला तुमचे पैसे पडले आहेत. असे सांगितल्याने गायकवाड हे मोटार सायकलच्या खाली उतरुन पडलेल्या पैन घेई पर्यंत त्यांनी मोटार सायकलच्या हँडलला लावलेली पैशाची बॅग कोणीतरी चोरी करून पळून गेले. त्या नंतर शिक्षक दादासाहेब गायकवाड यांनी केज पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गु र नं २६९/२०२३ भा. न्या. सं. ३०३(२), ३(५) नुसार अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजू वाघमारे हे तपास करीत आहेत.

चोरटे सीसीटीव्हीत कैद :-

पोलिसांनी महाराष्ट्र बँक, मंगळवार पेठ कॉर्नर येथील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असता एक निळ्या रंगाचा टि शर्ट व डोक्यावर टोपी असलेला इसम संशयितरित्या आढळून येत आहे. तसेच त्या नंतर तो संशयित गायकवाड यांच्या मोटार सायकलच्या पाठीमागे मोटार सायकलवर तो आणि डोक्याला हेल्मट घालून मोटार सायकल चालविणारा दिसत आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज मध्ये पैशाची बॅग चोरी करताना देखील चोर कैद झाला आहे.

नागरिकांनी सतर्कता बाळगावी बँकेतून रोख रक्कम घेऊन जाताना किंवा दागिने सोबत घेऊन जाताना महिला आणि नागरिकांनी ऐवज सुरक्षित ठेवावा आणि कोणी पाळत ठेवत असल्यास त्याची माहीती तात्काळ पोलिसांना द्यावी.

---- स्वप्नील उनवणे,पोलिस निरीक्षक, केज

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news