Beed Crime | तलवारीने केक कापणे महागात पडले : दोघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल, केज पोलिसांची कारवाई!

तलवारीसह दोन खंजीर जप्त
Beed Crime | तलवारीने केक कापणे महागात पडले : दोघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल, केज पोलिसांची कारवाई!
Beed Crime | तलवारीने केक कापणे महागात पडले : दोघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल, केज पोलिसांची कारवाई!
Published on: 
Updated on: 

केज : वाढदिवसाचा केक सुरी ऐवजी तलवारीने कापून, दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्याची रील सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांच्या कडून एक तलवार आणि दोन खंजीर जप्त करण्यात आले आहेत.

केज येथे दि. ६ ऑक्टोबर रोजी रात्री १०:०० वाजण्याच्या सुमारास अजय अशोक तांदळे आणि त्याचे साथीदार यांनी त्याच्या वाढदिवसा निमित्त वाढदिवस साजरा करताना तलवारीने केक कापला. दहशत निर्माण करण्यासाठी त्यांनी krishpanchal302 या सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम आयडी वरून व्हायरल केला. या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात अजय तांदळे आणि त्याचा मित्र सदाशिव नामदेव आंधळे या दोघांच्या विरुद्ध गु.र.नं. ६४१/२०२६ शास्त्र प्रतिबंधक अधिनियम कलम २५, ४ यासह महाराष्ट्र पोलिस अधिनियम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे हे पुढील तपास करीत आहेत.

व्हिडीओ व्हायरल होताच पोलिस ॲक्शन मोडवर

पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उंबरे यांच्या डी बी पथकातील पोलिस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे यांनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला तलवारीने केक कापतानाचा हा व्हिडिओ पाहिला आणि त्यांनी ही माहिती पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांना दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी डी बी पथकाला कारवाईचे आदेश दिले.

दोघांना घेतले ताब्यात

पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी कारवाईचे आदेश देताच जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ९ ऑक्टोबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर, डी बी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उंबरे, पोलीस उपनिरीक्षक अमीरोद्यीन इनमादार, पोलिस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अंहकारे, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल कविता गायकवाड, पोलिस कॉन्स्टेबल संतोष गिते, पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी कागदे, पोलिस कॉन्स्टेबल नितीन वारे, पोलिस कॉन्स्टेबल राहुल तरकसे, पोलिस कॉन्स्टेबल दादाराव देवगुडे यांनी मोबाईल लोकेशन आधारे अजय तांदळे आणि सदाशिव आंधळे या दोघांना ताब्यात घेतले.

तीन दिवसांची पोलिस कोठडी :

पोलिसांनी अजय तांदळे आणि सदाशिव आंधळे यांच्या घरातून तलवार खंजीर हे शस्त्र ताब्यात घेतले.अजय तांदळे आणि सदाशिव आंधळे या दोघांना न्यायालया समोर हजर केले असता त्यांना १२ ऑक्टोबर पर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती डी बी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उंबरे यांनी दिली.

"शस्त्र बाळगणे, दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने सोशल मीडियावर रील्स, व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल करून नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल."

राहुल सूर्यतळ, पोलिस निरीक्षक, केज

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news