Beed Crime | पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलीस फुस लावून पळवून नेले!

Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

केज : केज तालुक्यातील पोलीस अकादमी पोलीस भरतीची तयारी करीत असलेल्या १७ वर्षे ११ महिने वयाच्या मुलीस केज तालुक्यातून फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली.

लातूर जिल्ह्यातील एका गावातील मुलगी ही मागील अडीच महिन्या पासून बरड फाटा येथील सह्याद्री अकॅडमीत पोलीस भरतीची तयारी करीत होती. नागपंचमी सणाला ती गावाकडे गेली होती. २० ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता तिचे वडील दुचाकीवर घेऊन साळेगाव पर्यंत आले. तेथून ही मुलगी रिक्षातून केजला आली. दुपारी ३ वाजता अकॅडमी पर्यंत गेली. मात्र गेटच्या बाहेरून तिला फुस लावून पळवून नेले.

तिचा रंग गोरा असून उंची पाच फूट पाच इंच आहे. तिच्या अंगात पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस पायात पांढऱ्या रंगाचा बूट आहे. तिला आकाश कोंडीबा रोंगे (रा. मुरुड आकोला ता. लातूर जि. लातूर) याने फुस लावून पळवून नेल्याचा संशय असल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दिल्यावरून आकाश रोंगे विरुद्ध केज पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक राहुल सुर्यतळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार बाबासाहेब बांगर हे पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news