

बीड : शहरातील अंकुश नगर भागात काम करणाऱ्या एका मजुराचा गोळ्या झाडून आणि धारदार शास्त्राची वार करून खून केल्याची घटना 6 जानेवारी रोजी घडली होती. या प्रकरणातील आरोपी विशाल सूर्यवंशी याला बीड पोलिसांनी कळंब ते केज या रोडवरील एका पेट्रोल पंपावर सापळा रुतून अटक केले.
6 जानेवारी रोजी हर्षद शिंदे याचा खून केल्यानंतर सूर्यवंशी हा फरार झाला होता. परंतु त्याला पकडण्यात शिवाजीनगर पोलिसांना अपयश येत होते. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी प्रकरणात गतीने तपास करत सूर्यवंशी याला अटक केली.
दरम्यान या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील व्हायरल झाला असून यामध्ये सूर्यवंशी याने हर्षद शिंदे यांच्यावर कशा पद्धतीने गोळ्या झाडल्या व त्यानंतर फोन केला हे देखील समोर आले आहे. सोमवारी (दि.१२ जानेवारी) सूर्यवंशी याला शिवाजीनगर पोलीस न्यायालयात हजर करणार असून त्यानंतर या घटनेमागचे नेमके कारण समोर येऊ शकणार आहे.