Beed Crime News | तेलगाव कारखाना परिसरात वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा; परिसरात मोठी खळबळ

३ महिलांची सुटका; दोन आरोपींना अटक, न्यायालयीन कोठडी
Beed Crime News
Beed Crime News
Published on
Updated on

धारूर : धारूर तालुक्यातील व दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तेलगाव साखर कारखाना परिसरात सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायावर दिंद्रुड पोलीस व बीड येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने संयुक्तरीत्या धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत तीन महिलांची सुटका करण्यात आली असून महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

दिंद्रुड पोलीस ठाण्याला तेलगाव कारखाना परिसरात अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकला. कारवाईदरम्यान संबंधित ठिकाणाहून तीन महिलांची सुटका करण्यात आली.

या प्रकरणी मिना सुर्यवंशी व अनंत कोथिंबीरे या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून महिलांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करणे व भाग पाडल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही संयुक्त कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महेश भोसले, पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव तसेच पवनसिंग जंघाले यांच्या पथकाने केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना धारूर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानुसार आरोपींची जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती सपोनि महेश भोसले यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news