शुल्लक अपघाताने रिक्षातील महिलेला मारहाण , नेकनूरमध्ये दोन गट भिडले

Beed Crime News | पोलिस स्टेशनसमोरच एकमेकावर दगडफेक
शुल्लक अपघाताने रिक्षातील महिलेला मारहाण , नेकनूरमध्ये दोन गट भिडले
Published on
Updated on

नेकनुर : नेकनुरच्या बसस्थानकासमोर दुचाकीस्वाराला रिक्षाचा कट बसला या शुल्लक कारणातून दुचाकीस्वार रिक्षाचालकाला अडवून मारहाण करू लागला या रिक्षात बसलेल्या महिलेला मारहाण होत असल्याचे दिसताच काहींनी धाव घेतली यांनतर हा वाद पोलिस ठाण्यात पोहचला मात्र दोन्ही गट या ठिकाणी जमा झाल्याने ठाण्यासमोरच एकमेकावर दगडफेक झाली. पोलिसांनी तात्काळ बीड येथून पोलिसाची कुमक मागवून परिस्थिती नियंत्रणात आणली.

नेकनूरमध्ये अलीकडे रस्त्यावर काही किरकोळ अपघात घडल्यास मोठ्या वादात पर्यावसान होण्याच्या घटना घडू लागल्या आहेत .असाच प्रकार शनिवारी संध्याकाळी सायंकाळी आठच्या दरम्यान बसस्थानकासमोर घडला . रिक्षाकडून दुचाकीला कट बसल्याचे कारणाने मोठे स्वरूप घेतले. या रिक्षात असलेल्या महिलेलाही मारहाण करण्यात येत असल्याचे दिसतात आजूबाजूच्या काहीनी यामध्ये हस्तक्षेप केला. मात्र यानंतर हा वाद पोलीस स्टेशनकडे गेला बघता बघता दोन्ही समाजातील लोकांनी पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली आणि वादाने मोठे स्वरूप प्राप्त करीत ठाण्यासमोर एकमेकांवर दगडफेक सुरू केली .

पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे यांनी परिस्थिती नियंत्रणत ठेवण्यासाठी बीड येथून अतिरिक्त पोलिसाची कुमक मागवत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले . वै. बंकटस्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी सकाळीच अखंड हरिनाम सप्ताह उभा राहिला असून या कीर्तनासाठी जाणाऱ्या रिक्षा चालकासह महिलेला मारहाण झाल्याच्या वृत्ताने नेकनूरमध्ये संतापाची लाट उसळली यामुळे नेकनुर अशांत झाल्याचे पहायला मिळाले.

केजचे पोलिस उपअधीक्षक हे रात्री नेकनूरमध्ये परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. पोलिसाच्या फिर्यादीवरून दोन्ही गटातील लोकांवर पुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती असून नेकनुरचा रविवारचा आठवडी बाजार यामुळे बंद राहिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news