

केज : ट्युशनला जात असलेल्या एका अल्पवयीन मुलीला कारमधून घेऊन जात डोंगरी भागात तिच्यावर तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना केज तालुक्यात घडली असून याप्रकरणी धीरज सांजुरे या नराधमाविरोधात केज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज तालुक्यातील एका गावात राहत असलेली पंधरा वर्षीय मुलीची धीरज सांजुरे याच्याशी ओळख झाली. त्या ओळखीचा गैरफायदा घेत धीरज सांजुरे याने मंगळवारी (दि.६) मुलीला फिरायला जाण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर बुधवारी (दि.७) सकाळी पिडीता केज येथे ट्यूशनला जाण्यासाठी केज येथे आली असता सकाळी ९:३० च्या सुमारास धीरज सांजुरे पीडितेला एका कारमधून घेऊन गेला. केज येथून त्याने तिला धारूर तालुक्यातील अंबाचोंडी येथील डोंगरात घेऊन नेले. तिथे तेथील एका निर्जनस्थळी मुलीच्या इच्छेविरुद्ध त्याने तिच्यावर अत्याचार केला. घरी आल्यानंतर त्या पीडित मुलीने ही माहिती तिच्या पालकांना दिली. पालकांनी पीडित मुलीसह केज पोलिस ठाणे गाठून या घटनेची माहिती पोलिस अधिकाऱ्यांना दिली. दरम्यान या प्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.