Beed crime news | पत्नी नांदायला येत नसल्याने पतीने उचलले टोकाचे पाऊल ; प्रकृती गंभीर....

पोलिसांनी वेळीच दाखवलेल्या समयसूचकतेमुळे संबंधित तरुणाला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले
Beed crime news
Beed crime news
Published on
Updated on

आष्टी : तालुक्यात कौटुंबिक वादातून पत्नी नांदायला येत नसल्याच्या संतापातून एका पतीने पोलीस चौकीच्या आवारातच विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना आष्टी तालुक्यातील कडा पोलीस चौकीजवळ मंगळवारी दुपारी घडली. कडा पोलिसांनी वेळीच दाखवलेल्या समयसूचकतेमुळे संबंधित तरुणाला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्याची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.

नेमका वाद काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पाटोदा तालुक्यातील कारेगाव येथील राहुल छबू वाल्हेकर हा तरुण आपली पत्नी आणि मुलांना सतत मारहाण करत होता. या जाचाला कंटाळून त्याची पत्नी मुलांसह कडा येथे मजुरी करणाऱ्या आपल्या आई-वडिलांकडे राहण्यास आली होती. राहुल हा पत्नीला नेण्यासाठी कडा येथे आला होता, मात्र पत्नीने नांदायला येण्यास नकार दिल्याने त्यांच्यात कडा पोलीस चौकीच्या परिसरात मोठे भांडण झाले.

पोलीस ठरले देवदूत !

पत्नी येत नसल्याच्या रागातून राहुलने टोकाचे पाऊल उचलत कडा पोलीस चौकीजवळ असलेल्या विद्युत रोहित्रापाशी विषारी द्रव्य प्राशन केले. हा प्रकार लक्षात येताच कर्तव्यावर असलेल्या पोलीस हवालदार नंदकिशोर सवासे, भाऊसाहेब आहेर, गणेश भुतेकर आणि चंद्रमुनी बनसोडे यांनी तातडीने धाव घेतली. पोलिसांनी कोणतीही वेळ न घालवता रुग्णवाहिका बोलावून त्याला कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर राहुलची प्रकृती खालावल्याने त्याला पुढील उपचारासाठी अहिल्यानगर (अहमदनगर) येथे हलवण्यात आले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या या तत्परतेमुळे राहुलचे प्राण वाचवण्यासाठी मोठे यश मिळाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news