Beed Crime : भांडण सोडवायला गेलेल्या हॉटेल मालकाचा चाकू भोकसून खून

केज येथे कदमवाडी फाट्यावरील घटना
Beed Crime News
भांडण सोडवायला गेलेल्या हॉटेल मालकाचा चाकू भोकसून खून
Published on
Updated on

केज : भांडण मिटविण्यासाठी गेलेल्या हॉटेल मालकाचा चाकू भोकसून खून झाल्याची घटना समोर आली आहे. केजमधील कदमवाडी फाट्यावरील एका धाब्यावर ही घटना घडली. शनिवारी (दि.२०) सायंकाळी ७.३० वाजता ही घटना घडली. विलास घुले असे मृत हॉटेल चालकाचे नाव आहे.

केज तालुक्यातील कदमवाडी फाट्यावर विलास घुले आणि आकाश चाळक यांचे हॉटेल गावकरी नावाचे हॉटेल आहे. शनिवारी सायंकाळी आकाश चाळक आणि उमेश माने व स्वयंपाकी गणेश राजेंद्रप्रसाद शुक्ला असे बसलेले होते, त्यावेळी कदमवाडी फाटा येथून काही लोक चारचाकी गाडी क्र. ( एम. एच. ४४/ झेड ९५४२) या वाहनाने त्या ठिकाणी आले. उमेश माने यांच्याबरोबर बाबासाहेब कदम, त्यांचा भाऊ मंगेश कदम, बाबासाहेब कदम याचा सासरा रामेश्वर गायकवाड (रा. सोनीजवळा ता. केज) आणि त्यांचे इतर नातेवाईक होते. त्यावेळी 'तु माझ्या बायकोकडे का पाहतोस? तुला आज संपवतोच' असे म्हणत बाबासाहेब कदम याने उमेश माने याला मारहाण करण्यास सुरूवात केली. तेव्हा उमेश माने हा केजच्या दिशेने पळाला. त्याला वाचवण्यासाठी हॉटेल मालक विलास घुले आणि नितीन घुले हे देखील त्यांच्या मागे पळाले.

उमेशच्या पाठीमागे बाबासाहेब कदम, मंगेश कदम, रामेश्वर गायकवाड, शुभम गायकवाड, भैय्यासाहेब गायकवाड, तसेच कदमवाडी येथील अजय उर्फ बंकट कदम, नवनाथ कदम, दीपक कदम आणि संतोष कदम हे सर्वजण धावले. रेणू बारच्या समोर असलेल्या बंद समर्थ बिअर बारजवळ या टोळक्याने नितीन घुले आणि विलास घुले यांना गाठले व मारहाण सुरू केली. याचवेळी बाबासाहेब कदम याने आपल्यासमोरील नितीन घुले यांच्या देखत विलास घुले यांच्या पोटात धारदार चाकू खुपसला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विलास घुले यांना तातडीने केज येथील सरकारी दवाखान्यात आणि त्यानंतर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, दुर्दैवाने रविवारी (दि. २१) दुपारी तीन वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन

विलास घुले यांच्या मृत्यूनंतर केजमध्ये एकच खळबळ उडाली. मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांनी केज पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. तसेच, शहरातील मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन वेळा 'रस्ता रोको' आंदोलन करण्यात आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news