Beed Crime News | बनावट नोटांचे केज कनेक्शन ! माजी सरपंच अडकला तमिळनाडूत बनावट नोटांच्या रॅकेटमध्ये

तामिळनाडूत पेट्रोल पंपावर नोट चलनात आणताना पोलिसांच्या जाळ्यात
Beed Crime News | बनावट नोटांचे केज कनेक्शन ! माजी सरपंच अडकला तमिळनाडूत बनावट नोटांच्या रॅकेटमध्ये
pudhari photo
Published on
Updated on

गौतम बचुटे

केज : तामिळनाडू पोलिसांनी केज तालुक्यातील डोका गावातील माजी सरपंचासह एका व्यापाऱ्याला ८ लाख ३७ हजार रुपयांच्या बनावट नोटांसह अटक केली. तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यात थुवकुडी पोलिसांनी २१ जानेवारी रोजी ही कारवाई केली आहे.

केज तालुक्यातील डोका येथील माजी सरपंच रमेश बाबुराव भांगे, वय (५४ वर्ष) आणि व्यापारी नारायण राम, वय (३४ वर्ष) हे दोघे कार क्र. (एम एच- ४४/झेड-२३८३) तामिळनाडू राज्यात गेले होते. २१ जानेवारी रोजी तिरुचिरापल्लीतील थुवकुडी येथील पेट्रोल पंपावर त्यांनी इंधन भरल्या नंतर पेट्रोल पंपावर बनावट नोट दिली होती. या बनावट नोटा असल्याचे पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या लक्षात येताच त्यांनी ही माहिती स्थानिक पोलिसांना कळविली. त्यानंतर तामिळनाडू पोलिसांनी त्यांची कार चेकपोस्ट अडवून कारची झडती घेतली. त्यात पोलिसांना २०० रुपयांच्या नोटांची ४१ बंडले आढळली.

या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपबविण्यात आला आहे. पोलिसांच्या ताब्यातील रमेश भांगे आणि नारायण राम या दोघांनी थुवकुडीपूर्वी मदुराई, पुदुक्कोट्टई आणि तंजावर भागातही बनावट नोटा चलनात आणल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आली आहे. आणखी कुठे कुठे बनावट नोटा चलनात आणल्या. बनावट नोटा कोठून आणल्या आणि त्या कुठे छापल्या? या नोटांचे तामिळनाडू कनेक्शन काय आहे ? याचा तपास सुरू आहे. दरम्यान बनावट नोटांच्या रॅकेटमुळे बीड जिल्हा आणि केज तालुका पुन्हा चर्चेत आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news