Beed Crime | केज मधील व्यापाऱ्याच्या मुलाचे बीड येथून अपहरण!

 kidnapping
kidnapping
Published on: 
Updated on: 

केज:- बँकेच्या कामासाठी बीड येथे गेलेल्या केज मधील एका व्यापाऱ्याच्या २७ वर्षाच्या मुलाचे अज्ञात कारणासाठी अज्ञात व्यक्तीने अपहरणाच्या घटनेने केज आणि परिसरात खळबळ माजली आहे.

केज येथील प्रसिद्ध व्यापारी प्रमोद निनगुरकर यांचा २७ वर्ष वयाचा विवाहित मुलगा प्रतीक निनगुरकर हा दि. १५ ऑक्टोबर रोजी त्याची आई प्रतिभा निनगुरकर यांना तो बँकेच्या कामासाठी बीडला जात आहे, असे सांगून निघून गेला. त्या नंतर तो घरी आला नाही. तसेच त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल बंद असून त्याच्या मित्र व नातेवाईकाकडे चौकशी केली असता काही माहिती मिळाली नाही.

त्यामुळे प्रतिभा निनगुरकर यांच्या तक्रारी वरून त्यांचा मुलगा प्रतीक निनगुरकर यांचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण करण्यात आल्याची तक्रार केज पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

त्या वरून अज्ञात व्यक्ती विरुद्ध गु र नं ६४८/२०२६ नुसार भा न्या सं १४०(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल राम पवार हे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news