Beed crime news | महिला सरपंचाच्या पतीला सोशल मीडियावरून अश्लील व जातीवाचक शिवीगाळ : ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

जातीवाचक शिवीगाळ करीत जीवे मारण्याचीही धमकी
crime news
crime news Pudhari
Published on
Updated on

गौतम बचुटे

केज : केज तालुक्यातील अनुसूचित जातीच्या महिला सरपंच यांच्या पतीस एकाने सोशल मीडियावर अश्लील आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एकावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिवाचीवाडी (ता. केज) येथील अनुसूचित जातीच्या सरपंच सौ. प्रेरणा काळे यांचे पती दीपक रामभाऊ काळे आणि बंडू नारायण चौरे हे दोघे वॉट्सअपच्या सन २२ - २३ इलेक्शन टीम या नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी आहेत. या ग्रुपवर बंडू चौरे याने दीपक काळे यांना अनेकदा अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्याचबरोबर जातीवाचक शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली.

११ फेब्रुवारी रोजी रात्री दीपक काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बंडू चौरे याच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ६५/२०१६, भा. न्या. सं. २९६, ३५१(२) यासह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये ३(१), (एस), ३(२)(व्ही ए) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. प्रभारी सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे हे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news