

केज:- मंदिरा समोर त्याच्या पुढे लघुशंका करण्यास मज्जाव केल्याने दारुड्याने एकाला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करून त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिंचपूर ता. केज येथील भगवान किसन समुद्रे हे दि. ६ मे रोजी दुपारी ४:०० वाजण्याचे सुमारास चिंचपुर येथील मारोती मंदिरा समोर बसलेले असताना त्याच्या गावातील जावई शिवाजी चयनु मुंढे (रा. कोरेगाव, ता. केज) जि.बीड, हा धारुर रोडने गावात येत असतांना एका मंदिरा समोर लघवी करत होता. तो दारु पिलेला असल्याने भगवान समुद्रे हे त्याला चीतू मंदिरा समोर लघुशंका करु नको." असे म्हणाले. त्यावेळेस त्याने " तु काय सरपंच आहेस काय?" असे म्हणुन जातीवाचक शिविगाळ करुन चापटा बुक्याने मारहाण केली. तसेच त्याच्या हातातील बाटलीत असलेले पेट्रोल त्याने भगवान समुद्री यांच्या अंगावर टाकले. पेट्रोल डोळ्यात गेल्याने भगवान समुद्रे यांच्या डोळ्याला जखम झाली आहे.
भगवान समुद्रे यांच्या तक्रारी वरून शिवाजी मुंडे यांच्या विरुद्ध युसुफ वडगाव पोलिस ठाण्यात गु. र. नं. १२७/२०२६ भा. न्या. सं. ११५(२), ११८(१), ३५१(२), ३५२ आणि ॲट्रॉसिटीचे कलम १(३)(आर),१(३)(एस),३(२)(व्हि ए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस अधीक्षक वेंकटराम हे तपास करीत आहेत.