

Crop damage due to rain
आष्टी : तालुक्यातील चिंचाळा, बेलगाव, मांडवा,ब्रह्मगाव कडा व आष्टी परिसरात गुरुवारी सायंकाळी पाच वाजता जोरदार मुसळधार पाऊस होऊन शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.
यंदा मे महिन्यात गेल्या पाच ते सहा दिवसापासून अवकाळी पावसाने धुमाकूळ माजवला असून खरिपाच्या पेरण्याला अवधी असताना शेतीला तळ्याचे स्वरूप आले आहे. नदी,नाले अवकाळी पावसाने ओसंडून वाहायला लागले असून शेताच्या ताली फुटून शेतातील कांदा पिकासह , शेतातील मालाच अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.