Beed Accident : भरधाव कार वळणावर पलटी होऊन खड्ड्यात कोसळली; एक ठार, एक जखमी

केज - मांजरसुंबा रस्त्यावरील सारणी (सांगवी) जवळील घटना
Beed Accident News
भरधाव कार पलटी होऊन एक ठार, एक जखमी
Published on: 
Updated on: 

केज : वळणावर भरधाव कारच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार खड्ड्यात जाऊन पलटी झाल्याने दोघे जण गंभीर झाले. उपचारासाठी घेऊन जात असताना एकाचा वाटेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. केज - मांजरसुंबा रस्त्यावर सारणी - सांगवी दरम्यान सोमवारी (दि. १२) दुपारी ४.३० च्या सुमारास ही घटना घडली.

चाकरवाडी (जि.बीड) येथील अशोक आश्रुबा मोरे (वय २०) आणि पिंपळगाव (ता. केज) येथील कृष्णा रामेश्वर गायकवाड हे दोघे सोमवारी दुपारी ४.३० च्या सुमारास कारने मांजरसुंब्याकडून केजकडे येत होते. त्यांची कार ही सारणी - सांगवी दरम्यानच्या वळणावर आली असता कार चालक याचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या खाली खड्ड्यात जाऊन पलटी झाली.

या भीषण अपघातात कारमधील अशोक मोरे व कृष्णा गायकवाड हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नेकनूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तपासून अशोक मोरे याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. तर कृष्णा गायकवाड यांच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. दरम्यान, या रोडवर सलग दुसऱ्या दिवशी अपघात घडला असून दोन दिवसात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तिघांचे मृत्य झाल्याची माहिती समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news