Beed bus stand accident : एसटी महामंडळात जीविताचे मूल्य नगण्य

बसस्थानक गळती प्रकरण ः कार्यकारी अभियंता राजगिरे यांनी कंत्राटदारास केला दहा हजार दंड !
Beed bus stand accident
बीड बस स्थानकpudhari photo
Published on
Updated on

बीड : बीड बस स्थानकात अवकाळी पावसाने झालेल्या दुर्घटना संबंधी एसटी महामंडळाच्या कार्यकारी अभियंता यांनी कंत्राटदार यास दहा हजार रुपयांचा दंड केला असून कडक शब्दात सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. यावरून एसटी महामंडळास प्रवाशांच्या जीविताचे किती महत्त्व हे दिसून येत असून या बाबत प्रवाशांनी संबंधित अधिकाऱ्याची सखोल चौकशी करून त्याच्यावरच कारवाई करण्याची मागणी केली आहे.

बीड येथील अवकाळी पावसाने नव्याने बांधलेल्या बस स्थानकात मोठ्या प्रमाणावर गळती झाली होती तसेच पत्र उडून प्रवासी हा थोडक्यात बचावला होता, मात्र एसटी महामंडळाच्या स्थापत्य विभागाने या प्रकरणी सारवासारवी करून संबंधित कंत्राटदार याला केवळ दहा हजार रुपयाचा दंड करून पुन्हा जे जे काही व्यवस्थित नाही त्या त्या ठिकाणी नव्याने काम करून देण्याचे आदेश दिले आहेत.

Beed bus stand accident
Beed new bus stand leakage : नवीन बीड बसस्थानकाला गळती !

या शिवाय कंत्राट देताना ज्या काही अटी शर्ती लागू केला होत्या त्या विसरून कंत्राटदार याने लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचा सूचना दिल्या असल्याचे कार्यकारी अभियंत एम. व्ही राजगिरे यांनी सांगितले. दरम्यान स्थापत्य विभाग हा प्रवाशांच्या सोयी पेक्षा कंत्राटदार यांची जास्त सोय बघत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला असून असा हा कारभार पुढेही चालू राहिल्या तर हे बस स्थानक पाच ते सात वर्षात जानिम्दोस्त झाल्याशिवाय राहणार नसल्याची भीतीही आता व्यक्त केली जात आहे.

Beed bus stand accident
Smart Electricity Meter Issues | कल्पना न देता स्मार्ट मीटर लावले तर गाठ आमच्याशी! मालवणच्या ऊर्जा मित्र बैठकीत वीज कंपनीला सज्जड दम

केवळ दंडात्मक कारवाई

बीड बस स्थानक दुर्घटन आणि गळती प्रकरणी बीडच्या स्थापत्य विभागाने जो अहवाल पाठविला त्या नुसार संबंधित कंत्राटदार काझी-संघानिया यांना दहा हजार रुपयाचा दंड ठोठावला असून त्यांनी अजून काम पूर्ण केले नसून त्यामुळे त्यांचे पूर्ण देयक देण्यात आले नाही त्यामुळे जेव्हा हे काम पूर्ण होईल तेव्हा त्यांच्या देयकातून विलंब झाला या करिता अटी व शर्ती नुसार त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्या जाईल असे कार्यकारी अभियंता एम.व्ही.राजगिरे यांनी सांगितले.

  • मंत्री सरनाईक साहेब बघा आपल्या विभागात काय सुरु आहे ? असा सवाल प्रवासी आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना प्रवासी विचारात असून बीड येथील बस स्थानक दुर्घटना आणि गळती प्रकरणी स्थापत्य विभागाने दहा हजार रुपयाचा कंत्राटदार यास केलेला दंड हा केवळ मलमपट्टी असून यातून कंत्राटदार हा अजूनच मोकाट सुटणार असून कामाच्या गुणवत्तेबद्दल आता कितपत राहील याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news