Beed firing : मकोकातील फरार आरोपीने केला गोळीबार

बीडमधील प्रकार; पोलिसांनी पाठलाग करत केले जेरबंद
beer shop firing Beed
मकोकातील फरार आरोपीने केला गोळीबारpudhari photo
Published on
Updated on

बीड ः बिअर उधार न दिल्याच्या कारणावरून आशिष आठवले या मकोकातील फरार असलेल्या आरोपीने बियर शॉपी चालकाच्या दिशेने स्वतःच्या पिस्टलने फायरिंग केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री अकरा वाढण्याच्या सुमारास बीड शहरात घडली. यामध्ये बिअर शॉपी चालक जखमी झाला आहे. दरम्यान गोळीबाराच्या घटनेनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आशिष आठवले याला बीड शहर पोलिसांच्या टीमने सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फरार आरोपी अशीष आठवले याने काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास बीड शहरातील समर्थ बिअर शॉपी येथे बिअर शॉपी चालकाला उधारीने बिअर मागण्याच्या कारणावरुन व त्यास उधारीने बिअर न दिल्यामुळे त्याने त्याच्या जवळील गावठी पिस्टलने फायरिंग करुन फिर्यादी बिअर शॉपी चालक सौरभ सुधाकर राऊत यांना जिवे मारण्याचे उद्देशाने फायर करुन जखमी केले. त्यावरुन नमुद आरोपीवर पोलीस ठाणे बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरची माहिती प्राप्त होताच पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड व त्यांचे टिमने तसेच पोलीस ठाणे बीड शहरचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ आणि त्यांच्या टिमने सदर गुन्हयातील आरोपी आशीष आठवले याचा बीड शहरात शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकास आरोपी आशिष आठवले हा कबाडगल्ली येथून मोटरसायकलवर जात असल्याची माहिती मिळाल्याने सदर पथकाने त्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पथकाला पाहुन पळून जात होता. तेंव्हा पथकातील पोलीस अंमलदार अश्पाक सय्यद यांनी आरोपीस मिठी मारुन पकडले व त्याचे ताब्यातील गावठी पिस्तल व एक जिवंत काडतुस ताब्यात घेण्यात आले.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखालील पोनि.शिवाजी बंटेवाड, पोनि. शितलकुमार बल्लाळ, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोहवा सोमानाथ गायकवाड, अशोक दुबाले, राहुल शिंदे, पोलीस अंमलदार अशफाक सय्यद, मनोज परजणे, चालक नितीन वडमारे व पोलीस स्टेशन बीड शहर येथील पोह शहेंशाह सय्यद, राम पवार, संतोष शिंदे, ईलियास शेख, चालक फिरोज पठाण यांनी केली.

दरम्यान गोळीबार करणारा आशिष आठवले याच्याविरुद्ध 2024 मध्ये बीड शहर पोलिस ठाण्यात दाखल कलम 109,115 (2), 190, 191 (2), 191 (3) व बि.एन.एस. सह कलम 3/25 शस्त्र अधिनियम या गुन्ह्यामध्ये मोक्का लावण्यात आला होता. नमूद मकोकाच्या गुन्ह्यातील इतर सर्व आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आले होते, परंतु अशीष शामराव आठवले हा गुन्हा घडल्यापासून फरार होता.

तो वारंवार त्याचे रहाण्याचे ठिकाण बदलत असल्याने तो मिळून येत नव्हता. फरार आरोपी अशीष आठवले याने सोमवारी रात्री बीडमध्ये येऊन पुन्हा गोळीबार करून बिअर शॉपी चालकास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. सदरील घटनेनंतर तो पुन्हा पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला पोलिसांनी गजाआड केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news