Beed Crime | शाळेत व्हिडीओ शूटिंग; शिक्षकांना धमकावले, शिक्षिकेचा विनयभंग; महा-ई-सेवा केंद्र चालकावर गुन्हे दाखल

आष्टी तालुक्यातील आनंदवाडी येथील प्रकार
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

Ashti ZP School Incident

आष्टी : आष्टी तालुक्यातील बांदखेल आणि दौलवडगाव अंतर्गत येणाऱ्या आनंदवाडी जिल्हा परिषद शाळेत परवानगीशिवाय व्हिडीओ शूटिंग करून शिक्षकांना धमकावणे तसेच महिला शिक्षिकेशी गैरवर्तन करून विनयभंग केल्याच्या आरोपावरून शिवाजी परभणे याच्याविरुद्ध अंभोरा पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा, बीडकडूनही त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी परभणे हा बांदखेल येथे महा-ई-सेवा केंद्र चालवतो. शिक्षक त्याच्याकडे काम करत नसल्याच्या कारणावरून त्याचा राग असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी विद्यार्थी गेले असताना त्याने बांदखेल येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना दमदाटी केल्याचा तसेच त्याचा व्हिडीओ शूट केल्याचा आरोप आहे.

Crime News
Beed Drought News : दुष्काळी झळा तीव्र; जलसाठे १० टक्क्यांच्या खाली

यानंतर परभणे याने आनंदवाडी शाळेत जाऊन मुख्याध्यापक सुरेश कुटे कार्यालयात असताना ‘मुले कुठे आहेत?’ अशी विचारणा करत व्हिडीओ शूटिंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा शाळेत जाऊन सहशिक्षिका रोहिणी पाटील यांच्याशी मुख्याध्यापकांसमोर अर्वाच्य भाषेत बोलून दमदाटी केल्याचा आरोप आहे. तसेच ‘तुमचे अधिकारी माझ्यासमोर लटलट कापतात, तुझी नोकरी घालवीन,’ अशी धमकी देत रजिस्टर व अर्ज मागितल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

शाळेत त्रयस्थ व्यक्तीला व्हिडीओ शूटिंग करण्यास परवानगी नसतानाही हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी शिक्षिका रोहिणी पाटील यांनी अंभोरा पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news