Beed Crime | अंबाजोगाई तालुक्यात जातीवाचक उल्लेख करून तरुणीचा विनयभंग

बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Minor girl abuse
Minor girl abuse (File Photo)
Published on
Updated on

Ambajogai Molestation Case

परळी वैजनाथ : बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका २० वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध विनयभंगासह अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जूनरोजी रात्री साडेदहाच्या सुमारास पीडित तरुणी तिच्या घरी असताना आरोपी कैलास तुळशीराम पुरणे (रा. घोलपवाडी, ता. अंबाजोगाई) याने तिचा हात धरून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. उपस्थित नागरिकांना पाहून आरोपीने पीडितेच्या जातीचा उल्लेख करत शिवीगाळ केली. तसेच, या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाला.

Minor girl abuse
Beed Talkhed Murder Case Solved | तालखेड येथील जावयाच्या खुनाचा १२ तासांत उलगडा

या प्रकरणी पीडित तरुणीने बर्दापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यानुसार गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अंबाजोगाई उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषीकेश शिंदे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news