

First Senior Citizens Sammelan Ambajogai
अंबाजोगाई : ज्येष्ठ नागरिक संघ, अंबाजोगाई यांच्या वतीने 'ज्येष्ठांनी ज्येष्ठांसाठी' या अनोख्या संकल्पनेखाली महाराष्ट्रातील पहिल्या ज्येष्ठ नागरिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा, हा या आयोजनामागचा प्रमुख उद्देश आहे. सुसंस्कृत शहर म्हणून ओळख असलेल्या अंबाजोगाईत रविवारी (दि. १४) दुपारी २ वाजता हे ऐतिहासिक संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात येईल.त्याच बरोबर ज्येष्ठांसाठी खास सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला महिला ज्येष्ठांची लक्षणीय उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विधिज्ञ अनंतराव जगतकर भूषवणार असून, डॉ. अण्णासाहेब टेकाळे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. यावेळी केज विधानसभा मतदारसंघाचे आ. नमिता मुंदडा, माजी मंत्री पंडितराव दौंड, माजी आ. पृथ्वीराज साठे आणि राजकिशोर मोदी, डॉ. बी आय खडकभावी, अरुण रोडे, चंद्रकांत महामुनी, डॉ. दामोदर थोरात यांच्यासह अन्य प्रमुख मान्यवर उपस्थित राहून ज्येष्ठांना शुभेच्छा देतील.
अंबाजोगाई येथे होणारे हे पहिले राज्यस्तरीय स्नेहसंमेलन ज्येष्ठांसाठी एक अविस्मरणीय पर्व ठरणार आहे. दीपस्तंभ स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
जेष्ठ नागरिक संघाचे सचिव शिवाजी शिंदे, सहसचिव ज्ञानोबा कुकडे, उपप्रमुख श्रीमती मंगल भुसा, जगदीश जाजू, नारायण अण्णा केंद्रे यांच्यासह जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.