Beed accident | साळेगावात डिझेल वाहतुकीचा टँकर दुभाजकाला धडकला

विजेचे खांब आणि संरक्षक जाळ्या झाल्या भुईसपाट
Beed accident | साळेगावात डिझेल वाहतुकीचा टँकर दुभाजकाला धडकला
Published on
Updated on

गौतम बचुटे

केज : केज- कळंब रोडवर साळेगाव येथील बस स्टँडवर ११:१५ रात्री वा. च्या सुमारास एक डिझेल टँकर दुभाजकाला धडकून अपघात झाला आहे. यात दुभाजकावर असलेली विजेचे खांब आणि जाळ्या भुईसपाट होवून टँकरचे नुकसान झाले.

सोलापूरहून निघालेला डिझेलचा टँकर क्र. (एम एच २३/ए यू ४८६३) हे तेलगावाकडे जात होता. दरम्यान ६ एप्रिल रोजी रात्री ११ वाजून १५ मिनिटाच्या सुमारास साळेगाव येथील रस्त्यावर असलेले दुभाजक न दिसल्यामुळे अचानक भरधाव वेगात असलेला टँकर स्ते दुभाजकावर असलेल्या विजेच्या खांबाला धडकला. यामुळे खांब मोडून दुभाजकावरच्या संरक्षक जाळ्या भुईसपाट झाल्या. या अपघातात डिझेल टँकरचे आणि दुभाजकाचे मोठे नुकसान झाले आहे. टँकर चालक बळीराम देशमुख (रा. कन्नापूर ता. परळी) यांना मुका लागलेला आहे.

टँकर रिकामे होते म्हणून अनर्थ टळला

अपघातग्रस्त टँकर रिकामे असल्याने सुदैवाने अनर्थ टळला अन्यथा टँकर पेट घेण्याची भीती होती. तसेच शेजारी घरे होती.

माहिती मिळताच पोलिस तत्काळ हजर झाले

अपघाताची माहिती मिळताच रात्र गस्तीवर असलेले गस्तीवर हाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नागरगोजे आणि पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंभू देव दराडे हे हजर होऊन त्यांनी रस्त्यावरील वाहन आणि अडथळे दूर केले.

मेगाचा गलथानपणा

या महामार्गाचे काम करीत मेगा इंजिनिअर अँड इन्फ्रास्ट्रक्चर कं. मर्या यांनी या महामार्गावर गावाजवळ रस्ते दुभाजकाच्या ठिकाणी दुभाजक असल्याची माहिती दर्शविणारे फलक किंवा रात्री वाहनचालक यांचे लक्ष वेधण्यासाठी पिवळ्या पट्ट्या आणि इंडिकेटर्स लावले नसल्याने अनेक अपघात होत आहेत.

मेगावर सुद्धा गुन्हे दाखल करणे आवश्यक

मेगा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे रस्त्यावर अपघात झाल्यास कंपनी आणि त्यांच्या अधिकाऱ्या विरुद्ध पोलिसात गंभीर गुन्हे दाखल केल्या शिवाय ते दक्षता घेणार नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news