

केज :- केज व अंबाजोगाई महामार्गावर चंदन सावरगाव येथे हॉटेल निसर्ग जवळ ट्रॅक्टर आणि ट्रकच्या समीर समोर झालेल्या धडकेत ट्रकमधील दोघे गंभीर जखमी झाले आहे. अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून हटविण्याचे काम सुरू आहे.
दि. १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास केज-अंबाजोगाई महामार्ग क्र. (५४८-डी) वर चंदनसावरगावच्या पुढे असलेल्या हॉटेल निसर्ग ढाबा जवळ नांदेडकडे जात असलेला मालवाहू ट्रक क्र. (एम एच-२६/सी टी- ४११३) आणि येडेश्वरी साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करीत असलेले उसाने भरलेले ट्रॅक्टरच्या यांची समोरा समोर जोराची धडक झाली. या भीषण अपघातात ट्रकचे केबिन ची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली असून ट्रक मधील दोघे गंभीर जखमी झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच युसुफ वडगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मांजरे, पोलिस जमादार खाडे, पोलिस कॉन्स्टेबल धनंजय कारले, अशोक थोरात हे तातडीने अपघातस्थळी पोहोचले. जखमींना नागरिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढून जखमीना केज येथील उपजिल्हा रुग्णालय येथे प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असल्याची माहिती युसुफवडगाव पोलिसांन आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या रक्त संकलन केंद्राचे तंत्रज्ञ श्रीकृष्ण नागरगोजे यांनी प्रतिनिधींना दिली आहे.
दरम्यान ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि ट्रक व इतर वाहने ही मर्यादेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करीत असून अनेक वाहनांना रिफ्लेटर्स नसतात. तसेच वाहतकींचे नियम डावलले जात आहेत. अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर प्रशासनाने कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याची चर्चा होत आहे.