कपडे खरेदी करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांवर काळाचा घाला

Beed accident | दुचाकीला आज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघेही जागीच ठार
Beed accident
Beed accident
Published on
Updated on

गेवराई : बीडकडून दुचाकीवरुन गावाकडे परतत असताना आज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दोन तरुण जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी दि.२५ धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी उड्डाण पूलाजववळ घडली.

अभिजीत सुभाष राठोड (वय : २३) व अभिजीत एकनाथ पवार ( वय : २३, रा. जातेगाव, गावखोर तांडा, ता.गेवराई जि. बीड) असे या आपघातात झालेल्या तरुणाचे नावे आहेत. शनिवारी कपडे खरेदी करण्यास बीडला गेले होते.खरेदी झाल्यानंतर ही दोन्ही तरुण रात्री उशिरा गाव जातेगाव कडे परत असताना साधारण साडेआठ वाजेच्या सुमारास धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाडळसिंगी उड्डाण पूलाजववळ आज्ञात वाहनाने धडक दिल्याने अभिजीत पवार व अभिजीत राठोड या दोघांचा जागीच मृत्यू झाला.या आपघाताची वाहतूक पोलीसांना मिळताच दोन्ही मृत तरुण यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीस बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.रविवारी उत्तरीय तपासणीनंतर अभिजीत पवार आणि अभिजीत राठोड या दोघांवर गाव जातेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.झालेल्या दुर्घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news