Beed Accident news | केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू; रेणापूर फाट्याजवळ काळाचा घाला

या घटनेमुळे महसूल विभागात आणि केज तालुक्यात मोठी शोककळा पसरली आहे
Beed Accident news
Beed Accident news
Published on
Updated on

केज: तालुक्याचे तरुण आणि धडाडीचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे आज सकाळी लातूर-अंबाजोगाई महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात दुर्दैवी निधन झाले. रेणापूर फाट्याजवळ त्यांच्या कारला झालेल्या या अपघातात गिड्डे यांचा जागीच मृत्यू झाला असून, या घटनेमुळे महसूल विभागात आणि केज तालुक्यात मोठी शोककळा पसरली आहे.

नियंत्रण सुटले अन् कार पलटी झाली

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तहसीलदार राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत होते. रेणापूर फाट्याजवळ आले असता, कारवरील नियंत्रण सुटल्याने गाडी भीषणरीत्या पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की, गाडीचा मोठा चक्काचूर झाला. कारमध्ये गिड्डे हे एकटेच होते. वेगातील गाडी पलटी झाल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच प्राण गेला.

प्रशासनावर शोककळा

घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. एक कार्यक्षम, संयमी आणि लोकाभिमुख अधिकारी म्हणून राकेश गिड्डे यांची ओळख होती. त्यांच्या अशा अचानक जाण्याने प्रशासकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलीस तपास सुरू

हा अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत रेणापूर पोलीस अधिक तपास करत आहेत. प्राथमिक दर्शनी गाडीचा वेग जास्त असल्याने नियंत्रण सुटल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आणि मित्रपरिवार असून, संपूर्ण केज तालुक्यावर सध्या दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news