Beed Accident : कार-मोटरसायकलची समोरासमोर धडक; १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू , दोघे गंभीर

माजलगाव येथील बायपास रोडवरील घटना
Beed Accident News
कार-मोटरसायकलची समोरासमोर धडक
Published on
Updated on

माजलगाव : येथील बायपास रोडवर कार व मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी आहेत. हा अपघात मंगळवारी (दि.३०) सायंकाळी साडेसातच्या सुमारास झाला.

करीम खदीर शेख (वय १४ ) हा आपल्या चुलत भावांसह मोटरसायकलवरून बायपासहून संभाजी चौकाकडे जात होते. यादरम्यान समोरून भरधाव वेगात येणाऱ्या कारची त्यांच्या दुचाकीला समोरासमोर धडक झाली. धडक एवढी भीषण होती की, कारचा समोरील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातात करीमचा जागीच मृत्यू झाला असून कैफ इरफान पठाण व शफीक इम्रान शेख हे दोघे गंभीर जखमी झाले. या दोघांवर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news