

गेवराई, पुढारी वृत्तसेवा :
जालना -वडीगोद्री मार्गावरील शहापूर जवळील वळणावर बस आणि संत्रा वाहतूक करणाऱ्या आयशरचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून २० जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज (दि.२०) सकाळी ८.३० वाजेच्या दरम्यान घडली. अशी माहिती गोंदी पोलीसांनी दिली. (Beed Accident)
माहितीनुसार, गेवराईहून जालन्याकडे जाणारी गेवराई आगार बस क्रमांक एम एच २० बी एल ३५७३ व अंबडहून संत्रा घेऊन येणारा आयशर क्रमांक एम एच ०१सी आर ८०९९ चा वडीगोद्री जालना मार्गावरील शहापूर जवळ भीषण अपघात झाला. या अपघाताचा मोठा आवाज झाल्याने मठतांडा येथील ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेत बसच्या काचा फोडून जखमींना बाहेर काढले. यात सहाजण जागीच ठार झाले. तर २० जण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून १७ जणांना सकाळी तर उर्वरित 3 जणांना दुपारनंतर जालना येथे हलवण्यात येणार आहे. अशी माहिती रुग्णालयाच्या सूत्राने दिली.
अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार मयतांची नावे पुढीलप्रमाणे,
सतीश देविदास नाईक (वय वर्षे २९) रा. मुरादेवी, शेख जब्बार (वय वर्षे ५२), रा. मुरादेवी, राहिबाई रंगनाथ कळसाईत (वय वर्षे ६५)रा. मेहकर, वाहक बंडू तुळशीराम बारगजे (वय वर्षे ५२)रा. वडगाव डोक, ता. गेवराई, पंचफुला भगवान सोळंके (वय वर्षे ६५) रा. सुरडी अशी आहेत, तर एका ४८ वर्षीय महिलेची ओळख पटली नाही.या बसमध्ये एकूण २५ प्रवासी होते. ज्येष्ठ महिला, पुरुष व मुलांचा समावेश होता.
या अपघातामध्ये २० जण जखमी झाले आहेत. जखमींची नावे पुढीलप्रमाणे, गणेश कचरू क्षीरसागर (वय वर्षे ३६) रा. येलंब ता. शिरूर, सिद्धेश्वर गणेश क्षीरसागर (वय वर्षे १२) रा. येलंब ता. शिरूर, चालक गोरक्षनाथ लक्ष्मण खेत्रे (वय वर्षे ३७) रा. वाहेगाव, ता. गेवराई, भारत बन्सी हिंदोडे (वय वर्षे ५५) मारलर वाडी तालुका शिरूर, प्रभाकर भाऊराव गाडेकर (वय वर्षे ५५) रा. रेवकी देवकी, ता. गेवराई, बापूराव राधाकृष्ण निकम (वय वर्षे ५३) रा. साडेगाव ता. अंबड, शिफा मोसीन बागवान (वय वर्षे १०) रा. शहागड, ता. अंबड, अर्शिया मोबीन बागवान (वय वर्षे ४०) रा. सेलू, अफिफा मोहसीन बागवान (वय वर्षे १६)रा. सेलू, युसरा सोहेल शेख (वय वर्षे ३) रा. सेलू, कमल प्रभाकर गाडेकर (वय वर्षे ५०) रा. रेवकी देवकी, ता. गेवराई, विजय कुमार रमेश, (वय वर्षे ३६) रा. रावळ, उतरखंड, कमल रमेश रावलं (वय वर्षे ४० )रा. उतरखंड, कलावती चिमाजी कुऱ्हाडे(वय वर्षे ५०) रा. सुखापुरी ता. अंबड, जिल्हा जालना, कार्तिक सतीश कुऱ्हाडे (वय वर्षे ३) रा. सुखापुरी, भारत गणेश क्षीरसागर (वय वर्षे ३०) रा. शिरूर, ओंकार मनोज घुंगासे (वय वर्षे १७) रा. साष्ट, पिंपळगाव,अंजली अनिल दुधाने (वय वर्षे १५) रा. साष्ट पिंपळगाव, प्रवीण अनिल सुरासे (वय वर्षे २२) रा. अंतरवाली सराटी, अफसाना सोहेल शेख (वय वर्षे ३७) अशी जखमींची नावे आहेत.
अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात या जखमींवर वैद्यकीय वैद्यकीय अधीक्षक तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी उपचार केले असून. मयतांचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत.दरम्यान मयत आणि जखमींच्या नातेवाईकांनी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती. माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी उपजिल्हा रुग्णालयात येऊन जखमींची विचारपूस केली.
अपघात होताच घटनास्थळी मठतांडा येथील नागरिकांनी धाव घेतली. जखमींना बसमधुन बाहेर काढले. अपघाताची पोलीसांना माहिती देताच घटनास्थळी गोंदी पोलिस व वाहतूक पोलिसानी धाव घेत जखमींना रूग्णवाहिका द्वारे अंबड जालना हलविण्यात आले. भीषण अपघातामुळे अपघातस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
गेवराई आगारातील गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले वाहक बंडू बारगजे बंडू भाऊ नावाने परिचित होते. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे ते गेवराई आगारात अल्पावधीतच सर्वांच्या परिचीत झाले होते. एस टी कामगार संघटनेच्या माध्यमातून अनेक कर्मचाऱ्यांना त्यांनी न्याय मिळवून दिला आहे. बंडू भाऊ यांचे निधन झाल्याचे वृत्त कळताच गेवराई आगारातील अनेक कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गेवराई आगारात आज शोकाकुल पसरली आहे. बंडू भाऊ यांच्या पश्चात पत्नी, मुलगा सुदर्शन, मुलगा वैभव, मुलगी प्रिती असा परिवार आहे. चळवळीत कोहीनूर हिरा गेल्याने वडगांव ढोक गावात चूल पेटलीच नाही.