बीड येथे परप्रांतीय महिलेच्या माध्यमातून चालणाऱ्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

बीड येथे परप्रांतीय महिलेच्या माध्यमातून चालणाऱ्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा
Published on
Updated on

माजलगाव; पुढारी वृत्तसेवा : बीड शहरातील शाहुनगर अंबिका चौकात कुंटनखाना चालत आसलेल्या गुप्त माहिती द्वारे माजलगाव पोलिस विभागीय कार्यालयाचे साहा. पोलिस अधिक्षक डॉ.बी.धीरजकुमार यांनी नेमलेल्या विशेष पथकाद्वारे दि.३०रोजी सायं ५वाजण्याच्या सुमारास बनावट ग्राहक पाठवुन नियोजन बध्द कुंटणखाना चालवणारी सोजरबाई होनाजी खंडागळे हिस पैसे घेतांना पोलिसांनी छापा टाकुन आंटीसह सह दोन ग्राहक आढळून आले या ठिकाणी आसलेल्या ५ परप्रांतीय महिलेस आठ महिलेची सुटका करण्यात आली व सोजरबाई खंडागळेस आटक करण्यात आल्याची कारवाई करण्यात आली.

या बाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहिती वरून बीड शहरातील शाहुनगर भागातीलअंबिका चौकामध्ये येथे कुंटणखाना चालु असल्याच्या गुप्त खबरी वरून साहा.पोलिस अधिक्षक डॉ.बी.धिरजकुमार यांनी एक विशेष पथक तयार करण्यात आलं आणि या विशेष पथकामार्फत दि.३०रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शाहूनगर अंबिका चौक येथे छापा मारला असता सोजरबाइ होनाजी खंडागळे हिच्या घरामध्ये अतिशय योजनाबद्धरीत्या कुंटणखाना चालू असलेला आढळून आला. यासाठी एक बनावट ग्राहक तयार करण्यात आलं होतं आणि बनावट बनावट ग्राहकाकडून यातील सोजरबाई होनाजी खंडागळे हिने कुंटणखाना चालवण्यासाठी पैसे स्वीकारताच यातील पोलीस पथकाने छापा मारला आणि आंटी सह दोन ग्राहकांना रंगेहात सर्वांना पकडलं. सदरील छापा मारून एकूण आठ महिलांची सुटका करण्यात आली आणि या आठ पैकी चार महिला या पश्चिम बंगाल राज्यातील असून एक महिला झारखंडची आहे तसेच एक महिला बीड तसेच एक महिला ठाणे तशीच एक महिला मुंबई येथून आणण्यात आल्या होत्या. यातील सोजरबाई होनाजी खंडागळे हिला अटक करण्यात आलेली आहे. आणि या कुंटणखाना चालवणारी इतर टोळी ही आसु शकते त्या दृष्टीने तपास करणार आसल्याचे पोलीस सुत्रांनी कळवले आहे.

या धाडीत एक पिशवी भरून कंडोमची पाकिटे जप्त करण्यात आली आहे आणि तेथे यातून मिळालेली २५हाजार६०० रुपये जप्त करण्यात आले. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पिडितांची त्यांची सुटका केल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे.

सदरील कारवाई पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाटकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार यांनी अतिशय नियोजनबद्धरित्या कारवाई पार पाडली. पोलीस पथकामध्ये शीतलकुमार बल्लाळ,पोलीस निरीक्षक, बीड शहर, के.बी.माकणे,पोलीस उपनिरीक्षक,माजलगाव शहर, माजलगाव उपविभागीय कार्यालयाचे आतिशकुमार देशमुख , अशोक नामदास ,महिला पोलिस प्रभा ढगे,संतराम थापडे,तुकाराम कानतोडे,गणेश नवले यांचा तर बीड शहर चे अशपाक वाईकर यांचा सहभाग होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news