Basavaraj Patil : सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न

आ. बसवराज पाटील यांचे प्रतिपादन; आष्टीतील सत्कार सोहळ्यात धस यांच्या नेतृत्वाचे कौतुक
Basavaraj Patil
Basavaraj Patil : सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्नfile photo
Published on
Updated on

Basavaraj Patil: Efforts to increase irrigation area

आष्टी पुढारी वृत्तसेवा : बसवराज पाटील यांनी बीड जिल्ह्यासाठी मोठ्या पाणीपुरवठा व सिंचन योजना आणण्यावर भर दिला. बीड हा दुष्काळी जिल्हा असून, जिल्ह्यासाठी विविध मोठे सिंचन प्रकल्प आणण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसह महायुती सरकारने विविध जनहिताचे निर्णय घेतल्याचा दावाही त्यांनी केला.

Basavaraj Patil
Beed News : 'ये रे ये रे पावसा...' म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर !

धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्थेचे नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य आमदार बसवराज पाटील यांचा जाहीर सत्कार आष्टी येथील अद्वैतचंद्र निवास येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी बोलताना पाटील यांनी आपल्या विजयाचे श्रेय आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाला देत, "हा विजय मी सुरेश धस यांच्या नेतृत्वाला समर्पित करतो," असे प्रतिपादन केले.

यावेळी आ. सुरेश धस, आ. प्रकाश सोळंके, माजी मंत्री बदामराव पंडित, राजाभाऊ मुंडे, बाबुराव पोटभरे, डॉ. स्वरूपसिंह हजारी, सहालभाई चाऊस, हरुण इनामदार, विठ्ठलराव बडोले, प्रकाश आष्टे, दिलीप भालेराव, निजामभाई, प्रेमलताताई पारवे, संगीताताई बनसोड, शेख मुजीब भाई, परशुराम गुरखुदे, बाळासाहेब जाधव, शेषेराव बापू जगताप, रणजीतसिंह पंडित, रोहिदास गाडेकर, झिया बेग, राजू जाधव आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

Basavaraj Patil
Fertilizer Smuggling: बेकायदेशीररीत्या युरिया खताची वाहतूक करणारा ट्रक कृषी विभागाने पकडला

माजी मंत्री बदामराव पंडित यांनी सुरेश धस यांचा 'लोकनेते' असा उल्लेख करून त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. तसेच नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना मानधन मिळावे, अशी मागणी त्यांनी केली. बीड जिल्ह्यातील विजयी उमेदवार बसवराज पाटील यांना सर्वाधिक मतदान मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.

आमदार प्रकाश सोळुंके यांनी दुष्काळ व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नगरपंचायत, नगरपरिषद व नगरपालिका क्षेत्रातही शासनाच्या मदतीचा लाभ मिळावा, अशी मागणी केली. कार्यक्रमास बाबुराव पोटभरे, डॉ. स्वरूपसिंह हजारी, सहालभाई चाऊस, हरुण इनामदार, विठ्ठलराव बडोले, प्रकाश आष्टे, दिलीप भालेराव, निजामभाई, प्रेमलताताई पारवे, संगीताताई बनसोड, शेख मुजीब भाई, परशुराम गुरखुदे, बाळासाहेब जाधव, शेषेराव बापू जगताप, रणजीतसिंह पंडित, रोहिदास गाडेकर, झिया बेग, राजू जाधव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कार सोहळ्यादरम्यान व्यासपीठावरील मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला.

अजित पवार, पंकजा मुंडेंनी मदत केली: आ. धस

यावेळी आमदार सुरेश धस यांनी आपल्या राजकीय प्रवासात सहकार्य करणाऱ्या नेत्यांचा उल्लेख केला. विधान परिषदेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी मोठी मदत केली. तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निर्णयामुळे आपल्याला राज्य मंत्रिपदाची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. महायुतीच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुमित्रा पवार यांच्या विश्वासावर बसवराज पाटील यांना मतदान केले. सुनिल मालक आणि बसवराज पाटील यांनी आपल्या निवडणुकीत शंभरपेक्षा अधिक मते देऊन साथ दिली होती, त्याची प्रामाणिक परतफेड केल्याचे धस यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news