Beed news: आष्टी बसस्थानक उद्घाटनला मुहूर्त सापडेना ! प्रवाश्याचे अतोनात हाल...

Ashti Bus Stand Inauguration: लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेली इमारत अद्याप उद्घाटनाच्या प्रतिक्षेत
Beed news
Beed news
Published on
Updated on

कडा

राजू म्हस्के: आष्टी येथे बसस्थानकाची अध्यावत इमारत बांधण्यात आली आहे. मात्र या इमारतीचे उद्घाटन झाले नाही. मागील काही दिवसांपासून ही इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेली इमारत अद्याप उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असल्याने प्रवाशांना जुन्या पडक्या, अत्यंत घाणीचे साम्राज्य असलेल्या बसस्थानकाचा आसरा घ्यावा लागतोय.

प्रवाशांना ऊन, वारा, थंडीचा सामना करत प्रवास करावा लागतो. त्यातच पावसामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होत असते. त्यामुळे प्रवाशांना विशेषतः महिला प्रवाशांची मोठी अडचण होत आहे. दरम्यान या इमारतीचे तातडीने उद्घाटन करण्याची मागणी करण्यात येत आहे. नवीन बसस्थानक हे सुसज्ज असे बसस्थानक‎ साकारण्यात‎ आले आहे. तब्बल 10 बससाठी‎ प्लॅटफाॅर्म, एसटी‎ चालक-वाहकांसाठी रेस्टरुम, ‎व्यवसायिक गाळे, कॅन्टीनसह‎ अत्याधुनिक‎ सुरक्षा व्यवस्थाही या ठिकाणी तयार करण्यात आले आहेत. मात्र या बस‎ स्थानकाच्या सुरक्षितेसाठी सुरक्षा भिंत नसल्याने किंवा सुरक्षा रक्षक नसल्याने महिलांची सुरक्षा संदर्भात कुठल्याही उपयोजना‎ करण्यात आल्या नसल्याने या ठिकाणी आता‎ चोऱ्या होत असल्याचे चित्र आहे.‎

उपहार नसल्याने प्रवाश्याचे हाल

भूक किंवा तहान लागल्यावर नाश्ता-पाणी करायचे असेल तर बाहेर जावे लागते. नातेवाइकांना सोडण्यासाठी आलेल्या नागरिकांना आपले वाहन उभे करण्यासाठी जागेचेही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे किमती वाहन बेवारस ठेवावे लागणार आहे. फलाटावर कोणती बस लागली हे माहीत करून घेण्यासाठी चौकशी कक्षाजवळ जावे लागत आहे.

पिण्यासाठी बॅरलमध्ये अस्वच्छ पाणी

गरिबीची परी म्हणून ओळख असलेल्या बसस्थानकात प्रवाशांना पिण्यासाठी बोअरचे पाणी बॅरल मध्ये भरून आहे. लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या या बसस्थानकात शुध्द आणि थंड पाण्याचीही सोय करण्यात आलेली नाही. टाक्यांमध्ये जमा केलेले पाणी नागरिकांना पिण्यासाठी वापरावे लागणार आहे.अनेक प्रवासी बाहेरगावी जाण्यासाठी सकाळीच घरून निघतात. नाश्ता करण्याची इच्छा झाल्यास त्यांना बसस्थानकाच्या बाहेर जावे लागणार आहे.

हिरकणी कक्ष कुलूपबंद; स्तनदा मातांची गैरसोय...

प्रवास करणाऱ्या स्तनदा मातांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या स्थानकात हिरकणी कक्ष तयार करण्यात आले आहे. मात्र या खोलीलाही कुलूप असल्याने लहान बाळांना स्तनपान करताना सार्वजनिक ठिकाणी स्तनदा महिलाची मोठी गैरसोय होत आहे. ही बाब येथील व्यवस्थापनाकडे अनेकदा मांडण्यात आली. मात्र त्यांच्याकडून आम्ही काय करणार ? हा आमचा विषय नाही हा वरच्या लेव्हल चा विषय आहे असे उद्धट उत्तरे ऐकायला मिळतात. तरी सबंधितांनी तत्काळ कुलुपबंद हिरकणी कक्ष खुला करुन देण्यात यावा. उपहारगृह चालू नसल्याने प्रवाशी जनतेची उपासमारी होत आहे म्हणून एसटी स्थानकाच्या लोकार्पण सोहळ्याच्या मुहूर्ताची प्रतीक्षा न करता लवकरच स्थानक आवारात एसटी उपहारमूह सुरू करण्यात यावी,अशी मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे.

स्वच्छता गृह नसल्याने महिलांची कुचंबना...

वृद्ध महिला,गर्भवती महिला तसेच लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या महिलांना स्वच्छता गृह नसल्याने मोठी गैरसोयीचा सर्वाधिक फटका बसत आहे. सुरक्षित आणि स्वच्छ स्वच्छतागृहामुळे महिलांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. लाखो रुपये खर्चून उभारलेल्या आधुनिक बसस्थानकातही ही मूलभूत सुविधा उपलब्ध न होणे ही गंभीर बाब आहे.

सर्व सुविधा तयार; पण वापरासाठी ‘शासनाची परवानगी’ कुठे अडते?

नवीन बसस्थानकात १० बससाठी प्लॅटफॉर्म,चालक -वाहकांसाठी विश्रांतीगृहे, व्यापारी गाळे,कॅन्टीन, चौकशी कक्ष, हिरकणी कक्ष आणि आधुनिक सुरक्षा यंत्रणा तयार आहे.तरीही केवळ उद्घाटनाचा मुहूर्त न मिळाल्याने ही इमारत धूळ खात पडून आहे. मग कुठपर्यंत आमचा अंत पहायचा? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

लग्नसराईत प्रवाशांची गर्दी; धोका वाढला...

सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून प्रवाशांची संख्या वाढली आहे. गर्दीचा फायदा घेऊन चोरी,छेडछाड यासारख्या घटनांची शक्यता वाढली आहे. तरीही प्रशासन गप्प का? असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत.

लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देण्याची गरज...

आष्टी बसस्थानकासारख्या अत्यावश्यक सार्वजनिक सुविधेबाबत सुरू असलेली दिरंगाई ही गंभीर बाब ठरत आहे. लाखो रुपये खर्चून उभारलेले सुसज्ज बसस्थानक उद्घाटनाअभावी बंद ठेवले गेले असून, त्याचा थेट फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. प्रवाशांचे हाल सुरू असताना लोकप्रतिनिधी गप्प का?असा प्रश्न प्रवाशी विचारत आहेत. या संदर्भात आष्टी आगार प्रमुखांना फोन केला असता, तुम्ही रात्री का फोन केला असा प्रश्न करत फोन कट केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news