

Arrest all the accused in the murder case, relatives of deceased Yash Dhaka are aggressive
बीड, पुढारी वृत्तसेवा : बीडमधील पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा यश ढाका याचा गुरुवारी रात्री माने कॉम्पलेक्स परिसरात खून करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी सुरज काटे याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने १ ऑक्टोबरपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे.
बीड शहरातील बलभीमनगर भागातील रहिवाशी यश ढाका या युवकाचा माने कॉम्पलेक्स भागात सुरज काटे याच्याशी वाद झाला होता. त्याच कारणावरून गुरुवारी रात्री सुरज काटे याने यश ढाका याच्यावर धारदार शस्त्राचे वार केले. यावेळी परिसरात असलेल्या नागरिकांनी यश याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान या प्रकरणात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सुरज काटे याच्यावर गुन्हा दाखल होताच त्याला अटक करण्यात आली.
परंतु यश ढाका याच्या मित्राने दिलेल्या पुरवणी जवाबात आणखी काही युवकांची नावे समोर आली आहेत. त्यांनाही अटक करावी, अशी मागणी ढाका याच्या नातेवाईकांनी केली. तसेच जोपर्यंत या सर्व आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा पावित्रा घेतला होता. जिल्हा रुग्णालय तसेच शिव ाजीनगर पोलिस ठाण्यासमोर मोठा जमाव देखील जमा झाला होता. याच नातेवाईकांनी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या दरम्यानच्या रस्त्यावर उतरत आंदोलन केले.
यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, आता या प्रकरणात इतर काही आरोर्षीची नावे जवाबातून समोर आली असून त्यांच्यावर कारवाईसाठी दबाव वाढत आहे. दरम्यान सुरज काटे याच्यासह अन्य काही जणांचा या खून प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप यश ढाका याच्या नातेवाईकांकडून केला जात आहे. त्या संबंधीचा पुरवणी जवाबदेखील पोलिसांकडे दिल्याची माहिती असली तरी पोलिसांनी मात्र यास दुजोरा दिलेला नाही.
यश ढाका खून प्रकरणात माझा मुलगा गणेश शिराळे याला गोवण्याचा प्रयत्न केला जात असून तो त्या ठिकाणी उपस्थित नव्हता, त्याबाबतचे पुरावे असल्याचे निवेदन गोरख शिराळे यांनी पोलिस अधीक्षकांना दिले आहे. यशच्या खून प्रकरणात अटक असलेल्या सुरज काटे याच्यासह गणेश गोरख शिराळे व इतर काहीजणांची नावे पुरवणी जवाबाबमध्ये घेतल्याचे ऐकीव माहितीवरुन समजल्याचे गोरख शिराळे यांनी या निवेदनात म्हटले आहे. गणेश हा दि. २५ रोजी विविध मंडळांच्या आरतीसाठी उपस्थित होता. घटना घडली त्यावेळी तो डीपी रोड भागात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याचा दावा देखील गोरख शिराळे यांनी केला आहे.