आष्टी : तालुक्याला गर्भगीरी पर्वत लाभला असल्याने या ठिकाणी वन्यजीवांचा अधिवास आहे. येथील घाटापिंप्री येथील गावात 'एशियन स्मॉल सिवेट कॅट' हा जगातील सर्वात दुर्मिळ प्राणी विहिरीत पडल्याचे आढळून आला. त्यानंतर प्राणीमित्राने धाव घेत त्याला सुरक्षितपणे विहिरीतून बाहेर काढले.
वाघ-बिबट्या कुळातील आणि जगातील दुर्मिळ होत चाललेल्या 'एशियन स्मॉल सिवेट कॅट' या नावाने ओळखला जाणारा हा प्राणी गर्भगीरीच्या पायथ्याशी असलेल्या घाटापिंप्री येथील गावात आढळून आला. हा प्राणी परिसरातील हरी वायभासे यांच्या विहिरीत पडलेला आढळून आल्याने त्यांनी तात्काळ कडा येथील प्राणीमित्र नितीन आळकुटे यांना सांगितले. यानंतर लगेचच जीवदया टीमचे अक्षय भंडारी, नितीन आळकुटे व वनविभागाचे कर्मचारी तांदळे हे घटनास्थळी आले. व प्राणीमित्र नितीन आळकुटे यांनी विहीरीत उतरुन "एशियन स्मॉल सिवेट कॅट" या प्राण्याला विहिरीतून सुटका करून त्याला जंगलात सोडण्यात आले.