

नेकनूर : पुढारी वृत्तसेवा
नेकनूर येथून येळंबघाटकडे सोमवारी रात्री आठ वाजता चाललेल्या दुचाकी mh 23 BD 9896 ला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने यामध्ये दोन युवकांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला. जखमीवर बीड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या विषयी अधिक माहिती अशी की, नेकनूर येथील मिस्त्री काम करणारा युवक गणेश श्रीधर घरत (वय 29) याचा जागीच मृत्यू झाला, तर येळंबघाट येथील युवक पठाण अफजल पठाण अमजद (वय 17) याचा उपचारादरम्यान बीड येथे मृत्यू झाला. नेकनूर येथील बाबा कांबळे (वय 38) हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर बीड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास नेकनूर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल रतन नींगुळे, उबाळे हे करीत आहेत.