Beed Crime News : आ. जितेंद्र आव्हाड तुला महागात पडेल; गोट्याचा व्हिडिओ चर्चेत

परळी येथील सातभाई मारहाण प्रकरणातील आरोपी गोट्या गीते याचा जुना व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Beed Crime News
Beed Crime News : आ. जितेंद्र आव्हाड तुला महागात पडेल; गोट्याचा व्हिडिओ चर्चेत File Photo
Published on
Updated on

An old video of Gotya Geete, accused in the Satbhai assault case in Parli, is in the news once again.

बीड, पुढारी वृत्तसेवा : परळी येथील सातभाई मारहाण प्रकरणातील आरोपी गोट्या गीते याचा जुना व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यामध्ये गोट्या गीते याने आ. जितेंद्र आव्हाड तुला महागात पडेल असे म्हणत धमकी दिली आहे तर दुसरीकडे बबन गिते याने माझ्यासमोर बापु आंधळेला गोळ्या घातल्याचा आरोप देखील केला आहे.

Beed Crime News
Harit Beed Abhiyan | हरित बीड अभियानाच्या तयारीचा आ. नमिता मुंदडा यांच्याकडून आढावा

परळी येथील आरोपी गोट्या गीते हा गेल्या काही महिन्यांपासून फ रार आहे. त्याच्या मागावर पोलिसांचे पथक असतांना त्याचा नऊ मिनीटांचा जुना व्हीडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. यामध्ये गोट्या एका रेल्वे रुळावर बसलेला असल्याचे दिसते. यामध्ये तो जितेंद्र आव्हाड, अंजली दमानिया माझ्यावर खोटे आरोप करत असल्याचे म्हणत आहे. याबरोबरच सरपंच बापु आंधळे याला माझ्या समोर बबन गितने गोळ्या घातल्या, त्या प्रकरणातील मी फीर्यादी आहे म्हणून जितेंद्र आव्हाड माझ्या मागे लागल्याचे देखील गोट्या गीते म्हणत आहे. माझ्यावर मुखवटा चोरीचा आरोप करता, त्याची नोंद काढा.

जितेंद्र आव्हाड तुला हे महागात पडणार असे म्हणत धमकीही दिली आहे, त्यानंतर मी लहान सहान माणूस आहे, मला फाशी होईल ना होईल, पण माझ्या दैवताविषयी. असे का करायले, तुमच्या पक्षाचा प्रदेश उपाध्यक्ष बबन गिते अजुन फ रार आहे. असेही गोट्या गीते या व्हीडीओत म्हणत आहे. दरम्यान, हा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्र्यांना गृहखाते झेपत नसल्याचे वक्तव्य केले आहे. तसेच आ. जितेंद्र आव्हाड, अंजली दमानिया यांनी देखील गोट्या गीते हा सराईत गुन्हेगार असून पोलिस त्याला अटक का करत नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

Beed Crime News
Mahadev Munde Murder Case : महादेव मुंडे हत्येचा तपास कुमावत यांच्या नेतृत्वात

संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी

संतोष देशमुख मराठा की वंजारी मला देणे घेणे नाही, त्यांच्या आरोपींना फाशी शंभर टक्के भेटलीच पाहिजे पण तुम्ही वाल्मीक कराडच्या मागे विनाकारण लागला. वाल्मीक कराड माझे दैवेत आहे, धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट करु नका असे ही गोट्या गीते या व्हीडीओमध्ये म्हणतांना दिसतो. तब्बल नऊ मिनीटांच्या या व्हीडीओमध्ये गोट्याने अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत.

आ. आव्हाडांची मुंबईत जाऊन रेकी केली होती

गोट्या गीते आणि तांदळे नामक युवकाने मला, आ. सुरेश धस व आ. आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. मागच्या ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये या दोघांनी मुंबईमध्ये जाऊन आ. आव्हाड यांची रेकी केली होती असा खळबळजनक आरोप वाल्मीक कराडचे एकेकाळचे सहकारी बाळा बांगर यांनी केला आहे. गोट्या गीते हा सायको किलर आहे, एखाद्या लोकप्रतिनिधीची हत्या झाल्यावर त्याला अटक करणार आहात का? असा सवाल बाळा बांगर यांनी पोलिस प्रशासनाला केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news