विहिरीवर जिलेटिनच्या कांड्यांचा स्‍फोट; अल्‍पवयीन मुलगा जायबंदी, डोळा, हात निकामी

बाल कल्याण समितीच्या पाठपुराव्याने ३ महिन्यानंतर गुन्हा दाखल !
An explosion of sticks of gelatin over the well; A minor boy injured
विहिरीवर जिलेटीनच्या कांड्यांचा स्‍फोट; अल्‍पवयीन मुलगा जायबंदीFile Photo

गौतम बचुटे/केज (बीड)

केज तालुक्यात विहिरीवर ब्लास्टिंगचे होल घेण्याचे काम करणारा एका अल्पवयीन मुलगा जिलेटीनच्या स्फोटात गंभीर जखमी झाला. या स्‍फोटात मुलाचा एक डोळा व हात निकामी झाला आहे. ही घटना तीन महिन्यांपूर्वी घडली. सदर घटना लपवून ठेवली होती.

An explosion of sticks of gelatin over the well; A minor boy injured
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचे फॉर्म भरून घेताना अंगणवाडी सेविकेचे निधन

या घटनेचा बाल कल्याण समितीने पाठपुरावा केला. या घटनेनंतर तब्बल तीन महिन्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. असुरक्षित क्षेत्रात बालकामगारांचा सर्रास वापर होत असताना जिल्हा बाल कामगार अधिकाऱ्यांना याचा थांगपत्ता देखील लागत नसल्‍याने या विषयी संताप व्यक्‍त होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news