

अंबाजोगाई : आंबेजोगाई शहरात पोखरी रोडवर राजकुमार साहेबराव करडे या तरुणावर दोघा जणांनी कोयत्याने वार करून त्यास गंभीर जखमी केले होते. जखमी राजकुमारचा स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
प्रेम प्रकरणातून खून झाल्याचा गुन्हा आंबेजोगाई शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. महिनाभरातील प्रेम प्रकरणातून हत्या झालेली ही दुसरी घटना आहे. तर खून आणि हत्येच्या घटना बीड जिल्हा थांबायचे नाव घेत नाहीत त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोपींच्या अटकेसाठी एक पथक रवाना करण्यात आले आहे.
बीडच्या आंबेजोगाई शहरातील राजकुमार करडे हा दोन वर्षापासून शॉर्ट फिल्म बनवत होता. चनई येथील एका युवतीशी त्याचे प्रेम संबंध होते. तो नेहमी सांगायचा माझ्या तिच्यावर प्रेम असून आम्ही दोघे लग्न करणार आहोत. परंतु, जात समजल्याने तिचे वडील लग्नाला विरोध करत आहेत. नेहमी मला माझ्या मुलीचा नाद सोड नाहीतर जिवे मारून टाकू अशा धमक्या देत असल्याचे राजकुमार करडे याने आईला सांगितले होते.
वैजनाथ शिंदे, वेदांत शिंदे, या बाप लेकासह आदिनाथ भांडे, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात राजकुमार गंभीर जखमी झाला. त्याच्यावर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही अतिरक्तस्त्रावामुळे राजकुमारचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. दरम्यान, पुढील तपास अंबाजोगाई शहर पोलीस तपास आहे.