Beed News : चेक बाऊन्स प्रकरण पडले महागात; अंबाजोगाईच्या उद्योजकाला ३ महिने तुरुंगवास, ५ लाखांचा दंड!

अंबाजोगाई न्यायालयाचा निकाल
court
courtfile photo
Published on
Updated on

अंबाजोगाई : येथील 'एस सोल्युशन अर्थ वर्क अँड टेलिकॉम सर्व्हिसेस'चे प्रोप्रायटर ईश्वर भास्कर शिंदे यांना धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणी येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश भानुप्रताप चव्हाण यांनी ३ महिने कारावास आणि ५ लाख १७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दादा पेट्रोलियमचे मालक डॉ. सुजाता सोमवंशी यांच्याकडून घेतलेल्या उधारीच्या डिझेलचे पैसे थकवून त्या बदल्यात दिलेला धनादेश बँकेत न वटल्याने ही कायदेशीर कारवाई करण्यात आली. फिर्यादीच्या वतीने ॲड. प्रवीण मेटे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य शनिवारी (दि.२) न्यायालयाने याप्रकरणी निकाल दिला.

याबाबत अधिक माहिती अशी, ईश्वर शिंदे यांनी त्यांच्या कंत्राटी व्यवसायासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्री आणि वाहनांकरिता दादा पेट्रोलियमचे प्रोप्रायटर डॉ. सुजाता सोमवंशी यांच्याकडे डिझेलची मागणी केली होती. उभयतांमध्ये नातेसंबंध असल्याने सोमवंशी यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून नोव्हेंबर २०२१ ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत एकूण १० लाख २३ हजार ८७२ रुपयांचे डिझेल उधारीवर दिले होते. त्यापैकी काही रक्कम आरोपीने वेळोवेळी जमा केली, मात्र ४ लाख ३० हजार ८७२ रुपये येणे बाकी होते. या थकीत रकमेसाठी शिंदे यांनी आयडीबीआय बँकेचा ८ सप्टेंबर २०२३ रोजीचा धनादेश दिला होता, मात्र खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो बँकेतून परत आला.

धनादेशाचा अनादर झाल्यानंतर फिर्यादीने त्यांचे विधीज्ञ ॲड. प्रवीण मेटे यांच्यामार्फत आरोपीला नोटीस पाठवून रकमेची मागणी केली होती. नोटीस मिळूनही पैसे न मिळाल्याने डॉ. सोमवंशी यांनी अंबेजोगाई न्यायालयात धाव घेतली. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान ॲड. प्रवीण मेटे यांनी सादर केलेले कागदोपत्री पुरावे आणि प्रबळ युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला. न्यायालयाने आरोपीला दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त १५ दिवस कारावासाची शिक्षाही सुनावली आहे. या निकालामुळे व्यापाऱ्यांमध्ये कायदेशीर प्रक्रियेबद्दल विश्वास निर्माण झाला असून ॲड. प्रवीण मेटे यांच्या कायदेशीर कौशल्याचे कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news