Bajrang Sonawane | अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता का? : खा. सोनवणे

अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी
Ajit Pawar Aircraft Incident
अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता का? : खा. सोनवणे pudhari photo
Published on
Updated on

बीड ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित होत असून, विमान लँड होण्यापूर्वीच त्याचा हवेत स्फोट झाला होता का? त्यात बॉम्ब होता की इंधनाचा स्फोट झाला? या सर्व बाबींचा उच्चस्तरीय तपास झाला पाहिजे, अशी आक्रमक मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे.

केज तालुक्यातील येडेश्वरी साखर कारखाना येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत खा. सोनवणे बोलत होते. राजकीय जीवनात अजित पवार हे माझे पालक होते. त्यांच्या निधनाने माझे मोठे वैयक्तिक नुकसान झाले आहे, अशा शब्दांत त्यांनी शोक व्यक्त केला. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ येडेश्वरी साखर कारखाना परिसरात भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

Ajit Pawar Aircraft Incident
Nanded Mayor Election : नांदेड महापौरपदासाठी भाजपकडून कविता मुळे

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करा

अपघाताबाबत सखोल चौकशीची मागणी करताना खा. सोनवणे म्हणाले की, या प्रकरणाचे सर्व तपशील समोर येणे गरजेचे आहे. देवगिरी बंगला आणि विमानतळावरील त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक केले पाहिजेत. विमान हवेत असतानाच बिघाड झाला की आणखी काही कारस्थान होते, हे तपासयंत्रणांनी स्पष्ट करावे.

विलीनीकरणाच्या चर्चेवर स्पष्टीकरण

राष्ट्रवादी काँग््रेासच्या विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर त्यांनी स्पष्टीकरण दिले. अशा कोणत्याही बैठकीला मी उपस्थित नव्हतो. काही दिवसांपूर्वी अजित दादांसोबत प्रवास करताना आमची महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली होती. परंतु, ज्यांच्याशी चर्चा झाली तेच व्यक्तिमत्त्व आज हयात नसल्याने त्या चर्चेला आता अर्थ उरलेला नाही, असेही त्यांनी नमूद केले.

Ajit Pawar Aircraft Incident
Horoscope 7 February 2026: यशस्वी प्रयत्नांचा दिवस! तुमची रास काय म्हणते? पाहा आजचे राशीभविष्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news