Beed Crime| ओबीसी आरक्षणाच्या ताटात मराठा समाजाला का बसविले? म्हणत तरूणाने उचलले टोकाचे पाऊल

राहत्या घरात गळफास घेऊन संपविले जीवन
Beed Crime| ओबीसी आरक्षणाच्या ताटात मराठा समाजाला का बसविले? म्हणत तरूणाने उचलले टोकाचे पाऊल
Published on
Updated on

बीड : ओबीसी आरक्षणाच्या ताटात मराठा समाजाला का बसविले अशी चिठ्ठी लिहून ओबीसी आरक्षण जाण्याच्या भीतीने तरूणाने जीवनयात्रा संपविली. ही घटना बुधवारी (दि.२५) बीडमधील साळ गल्ली पेठ येथे घडली. राहुल ज्ञानेश्वर पतंगे (वय ३५, रा. साळ गल्ली पेठ बीड) असे या तरूणाचे नाव आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी ओबीसी आरक्षणाच्या ताटात मराठा समाजाला बसवले. त्यामुळे मी बलिदान देत असल्याचा उल्लेख त्याच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत आहे. तसेच पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, लक्ष्मण हाके यांना समाजाने सपोर्ट करावा, असे देखील या चिठ्ठीमध्ये लिहून ठेवले आहे. पोलिसांनी चिठ्ठी ताब्यात घेत पंचनामा केला. त्यानंतर राहूल यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविला. त्यानंतर नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी करत केला व शिवविच्छेदन करण्यास विरोध दर्शवला. यानंतर पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांनी समजूत घातल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. डॉ. सारिका योगेश क्षीरसागर यांनी पतंगे कुटुंबीयांच्या घरी भेट देत त्यांना धीर दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news