Bribe Case : सहकार अधिकारी २५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात

गेवराईत शॉर्टसर्किटमुळे चार दुकानांना आग; तीस लाखांचे नुकसान
Bribe Case
Bribe Case : सहकार अधिकारी २५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यातpudhari photo
Published on
Updated on

A cooperative officer was caught red-handed by the ACB while accepting a bribe of 25,000 rupees

अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा अंबाजोगाई शहरातील सहायक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी संतोष भंडारी यास २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने सोमवारी दुपारी रंगेहाथ पकडले.

Bribe Case
Beed News : बीडचे बसस्थानक बनले अवैध धंद्यांचा अड्डा

एका पतसंस्थेविरुद्धच्या तक्रारी निकाली काढण्यासाठी भंडारी याने संबंधित संस्थेच्या सचिवाकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी पहिला हप्ता स्वीकारताना ही मोठी कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित पतसंस्थेच्या विरोधात असलेल्या तक्रारींचे निवारण करण्याच्या बदल्यात भंडारी याने लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी पतसंस्थेच्या सचिवांनी जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली होती.

Bribe Case
गेवराईत शॉर्टसर्किटमुळे चार दुकानांना आग; तीस लाखांचे नुकसान

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सोमवारी दुपारी अंबाजोगाई येथील सहायक निबंधक कार्यालयात सापळा रचला. लाचेच्या एकूण ५० हजार रुपयांपैकी २५ हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले ही रक्कम स्वीकारताना पथकाने भंडारी यास पथकाकडून रंगेहाथ ताब्यात घेतले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून संतोष भंडारी याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून या प्रकरणातील अधिक तपशील तपासानंतर समोर येईल असे पथकाकडून सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news