Beed Crime | आम्ला शिवारात तलवाडा पोलिसांचा छापा: ८० किलो अफूसह २० लाखांचा मुद्देमाल जप्त

गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाणे हद्दीतील आम्ला गावाच्या शिवारात कारवाई
Talwada police 80 kg opium seizure
Talwada police 80 kg opium seizure Pudhari
Published on
Updated on

Talwada police 80 kg opium seizure

गेवराई : गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाणे हद्दीतील आम्ला गावाच्या शिवारात बेकायदेशीररित्या अफू पिकाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तलवाडा पोलिसांनी छापा टाकून सुमारे ८० किलो अफू जप्त केली असून जप्त केलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत सुमारे २० लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आम्ला शिवारातील गट क्रमांक २१३ मधील शेतात अफूची बेकायदेशीर लागवड करण्यात आल्याची माहिती तलवाडा पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली होती. या माहितीच्या आधारे तलवाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून गेवराई येथील फॉरेन्सिक पथकाला बोलावले आणि कारवाईचे नियोजन करण्यात आले.

Talwada police 80 kg opium seizure
Beed Crime News | एकटी असल्याचा फायदा घेत विवाहितेचा छळ; राज्य महिला आयोगाच्या दखलींनंतर केजमध्ये ॲट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल

त्यानुसार बुधवारी (दि. ४) दुपारी सुमारे तीनच्या सुमारास पोलिसांनी संबंधित शेतावर छापा टाकला. तपासणीदरम्यान शेतात अफू पिकाची लागवड करण्यात आल्याचे आढळून आले. यावेळी पोलिसांनी सुमारे ८० किलो अफू जप्त करत सुमारे २० लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

या प्रकरणी उपनिरीक्षक कैलास अन्नालदास यांच्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर कदम (वय ४०, रा. आम्ला) याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक स्वप्नील कोळी करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news