बीड : परळी वैजनाथमध्ये देशी गावठी कट्टयासह दोन जिवंत काडतुस जप्त ! | पुढारी

बीड : परळी वैजनाथमध्ये देशी गावठी कट्टयासह दोन जिवंत काडतुस जप्त !

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा : परळीतून एका कडून देशी गावठी कट्टयासह दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात पोलीसांना यश मिळाले आहे. संभाजीनगर परळी वै. पोलीसांनी आज ही कार्यवाही केली आहे.

संभाजीनगर पोलीसांना गुप्त माहिती मिळाली की, सुरजसिंग प्रेमसिंग जुन्नी (रा फुलेनगर परळी) हा उड्डुणपुलाखाली थांबला असुन त्यांचे जवळ गावठी कट्टा आहे. पोलीस स्टाफ व दोन पंचासह रवाना होवून सुरजसिंग प्रेमसिंग जुन्नी रा फुलेनगर परळी हा उड्डाणपुला खाली शिदी खाण्याचे समोर मिळून आला पंचा समक्ष त्याची अंग झडती घेतली असता त्याचे कंबरेला उजव्या बाजूस पॅन्टंमध्ये खोवलेला स्टेनलेस स्टीलचा गवठी बनावटीचा मॅगझीनसह कटटा (पिस्टल) आढळून आला. असे एकुण किमंत 42,000/- रुपयांच्या मुद्देमालासह मिळून आल्याने दोन्ही पंचासह जप्ती पंचनामा करुन मुद्देमाल व आरोपी ताब्यात घेवुन त्यावरुन भारतीय शस्त्र अधिनियम 1959 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि ए.टी. शिंदे करीत आहेत. पो.नि उस्मान शेख, यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि शिंदे, पोह/भांगे, पोना/सानप, पोना/ मस्के, पोना/ शिंदे, पोकों/ फड, पोकों गुट्टे यांनी ही कारवाई केली.

Back to top button