गेवराई : शहागड गोदावरी पाञात सापडले पुरातन क्रूड तोफ | पुढारी

गेवराई : शहागड गोदावरी पाञात सापडले पुरातन क्रूड तोफ

गेवराई; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय महामार्ग 52 वरील जुन्या पुलाखाली गोदावरी नदी पात्रात बुधवारी (दि. 3 रोजी) सायंकाळी शेतकऱ्यांना एक पुरातन क्रूड तोफ आढळून आली.

गोदावरी नदीपात्रात शेतकरी मोटार पाण्यात ढकलत असताना खड्ड्यामध्ये पुरातन प्रॅक्टिस राऊंड फायरगन आढळून आली. नदी पात्रात पाणी कमी झाल्याने शेतकऱ्यांना ही मिसाइल पहायला मिळाली. ही मिसाईल तपासून पाहण्याकरीता बॉम्ब स्कोड घटनास्थळाला बोलावण्यात आले आहे. घटनास्थळी सरपंच एड. नारायण शिंदे, महसूल विभागाचे कर्मचारी मंडळाधिकारी पखाले, खामगाव येथील सरपंच भाऊसाहेब डिगंरे यांनी नागरिकांना पुरातन बॉम्बला कोणी हात लावू नये अशा सूचना दिलेल्या आहेत.

यावेळी गेवराई पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी सदरील मिसाईल सदृश्य वस्तू गेवराई पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात आली. बॉम्ब पथकाला राञी पाचारण करण्यात आलेले असून  पुरातन व निष्काम असल्याचे तपास पथकाने संबंधित पोलिसांना यावेळी सांगितले.

Back to top button