श्री दत्तप्रभूंच्या जयघोषात दुमदुमली पंचाळेश्वर नगरी

श्री दत्तप्रभूंच्या जयघोषात दुमदुमली पंचाळेश्वर नगरी
Published on
Updated on

बीड; पुढारी वृत्तसेवा : महानुभव पंथाचे उपकाशी व श्री दत्तात्रेय प्रभुंचे नित्य भोजन स्थान असलेले श्री क्षेत्र पांचाळेश्वर (ता. गेवराई) येथे श्री दत्तात्रेय प्रभू अवतार दिन मंगळवारी मोठ्या भक्तीभावाने उत्साहात साजरा करण्यात आला. भक्तांच्या लांबच लांब रांगेत आज दिवसभर भक्ताची मांदियाळीने परिसर दुमदुमून गेला होता. प्रभू दत्ताचे कोल्हापूरला सकाळची भिक्षा, मध्यान्ह भोजन श्री क्षेत्र पांचाळेश्वरला व निद्रा माहुरगडला असे दत्तात्रेय प्रभुंचे नित्य उपक्रम असून, पांचाळेश्वर हे अन्यसाधारण महत्त्व असलेले स्थान आहे.

पांचाळेश्वर येथे पहाटे चार ते पाच अभिषेक (स्नान) पाच ते सहा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यानंतर सात ते नऊ दत्तात्रेय बाळक्रीडा ग्रंथाचे व दत्तात्रेय स्तोत्र पठण पारायण होऊन सकाळी ११ ते ११.३० आत्मतीर्थ स्नान करून दुपारी १२ ते १२.३० महाआरती करून रात्री प्रभूची पालखी मिरवणूक काढण्यात आली.

श्री दत्तात्रेय जन्मोत्सव निमित्ताने येणाऱ्या सर्व भाविकांना सकाळी श्री दत्तात्रेय प्रभू आत्मतीर्थ प्रतिष्ठानतर्फे लाडूचा प्रसाद वाटप करण्यात आला. दुपारी पंगतीचे आयोजन करण्यात आले होते. दत्त जयंती निमित्त सात दिवस सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील श्री दत्तात्रेय प्रभु जन्म स्थान असलेल्या पंचाळेश्वर येथे श्री दत्तात्रेय प्रभू अवतार दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची दि. २० डिसेंबर पासून सुरुवात करण्यात आली होती. देशातील एकमेव श्री दत्तात्रेय प्रभु भोजन स्थान असलेल्या गेवराई तालुक्यातील पंचाळेश्वर येथे दि. २० डिसेंबर पासून श्री दत्तात्रेय प्रभू अवतार दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह चे आयोजन करण्यात आले होते . या निमित्त आज दिनांक २६डिसेबर रोजी सप्ताह संपन्न झाला.

पहाटे पाच वाजता आरती, सकाळी सात ते नऊ गीता पारायण, नऊ ते अकरा श्री दत्तात्रेय कवच पारायण, दुपारी बारा वाजता मध्यान आरती, दुपारी एक वाजता भोजन, तीन ते पाच पोथी, सायंकाळी पाच ते सात देवपूजा प्रसाद वंदन, सायंकाळी सात वाजता आरती, रात्री नऊ ते अकरा संगीत श्री दत्तात्रेय कथा अशी दैनंदिन कार्यक्रम घेण्यात आले.

प.पु.प.म. श्री पंडित बाबा बिडकर यांची पोथी तर प.पु.प.म. श्री व्यास बाबा कोठी (शास्त्री)यांची भव्य संगीत श्री दत्त कथा संपन्न झाली. या कार्यक्रमास सर्व भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती.

दि. २० डिसेंबर रोजी क सप्ताहाची सांगता झाली असून दुपारच्या आरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते. रात्री श्री मूर्तीची पालखी (छबीना) निघाला असून सर्व ईश्वर प्रेमी भक्त मंडळींनी या धार्मिक सोहळ्याचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.

महानुभाव पंथाची उपकाशी व प्रभू दत्तात्रय याचं मध्यान्ह भोजन स्थान श्री क्षेत्र पांचाळेश्वर असून लाखो भाविक भक्तांची मांदियाळी या ठिकाणी भरत असते परंतु या ठिकाणी शासनाने कुठल्याही भक्तांसाठी सुख सुविधा उपलब्ध केल्या नसून शासनाने भक्ताने या तिर्थक्षेत्रला निधी उपलब्ध करून द्यावा.
– रविंद्र कोठी, अध्यक्ष श्री क्षेत्र पांचाळेश्वर

त्रेतायुगा पासून हे स्थान असून जो पर्यंत सुर्य चंद्र तारे आहेत तो पर्यंत या ठिकाणी प्रभू दत्तात्रय भोजनासाठी येणार या ठिकाणी भाविकांची खूप मोठी श्रध्दा असून अनेक विधीवत उपक्रमाची रेलचेल या ठिकाणी नेहमीच सुरू असते महाराष्ट्र सह पंजाब मधील सुध्दा महानुभाव पंथाचे अनुयायी या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात.
– महंत गुरूवर्य गुजर बाबा श्री क्षेत्र पांचाळेश्वर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news