बीड : परळी महामार्गावर अपघातात दोन ठार

बीड : परळी महामार्गावर अपघातात दोन ठार
Published on
Updated on

पिपंळनेर; पुढारी वृत्तसेवा : बीड परळी महामार्गावर बीडकडे निघालेल्या चारचाकीला मैंदा पोखरी गावच्या नजीक ऊसाच्या ट्रॅक्टरने धडक दिली. पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये झालेल्या या अपघातात दोघेजण ठार तर तीन जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.

पिंपळनेर येथे झालेल्या या अपघातात आई व मुलाचा जागीच मृत्यू झाल्याने उपळी गावांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातामध्ये चारचाकीतील मयत रत्नमाला केशव पवार आणि मुलगा प्रदीप केशव पवार राहणार उपळी तालुका वडवणी असे मयत झालेल्यांची नावे आहेत. इतर जखमींना पिपंळनेर पोलिस कर्मचारी बहिरवाळ यांनी बीड शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती दिली आहे.

भाच्याला वाचवण्यासाठी घेऊन जाताना हा आपघातात घडल्याची माहिती दिली आहे. असून इतर तीन जण गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news