पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा : बीड तालुक्यातील बीड- परळी महामार्गावर पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाच होटेल मध्ये अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती मिळताच बीड पोलिस अधिक्षक यांच्या विशेष पथकाची अवैध दारू विक्री करणाऱ्या होटेल धाडी टाकून कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई हॉटेल आर्या, हॉटेल जाणता राजा, हॉटेल मेम्बर, हॉटेल सुखसगर, हॉटेल 7।12 मालका विरोधात पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून देशी विदेशी दारू सह एकूण 20000 ची देशी विदेशी दारू जप्त करून 5 आरोपी अटक केली आहेत ही कारवाई विशेष पथक प्रमुख सपोनि गणेश मुंढे, विष्णू वायबसे, स्वाती मुंढे आदी पोलिस कर्मचारी यांनी केली आहे.