अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव महामार्गावरील साठवण तलवामध्ये अंबा कारखाना परिसरातील दोन कुटूंब कपडे धुण्यासाठी गेले होते. यावेळी बारा वर्षीय अश्विनी लहू जाधव ही मुलगी बुडू लागल्यामुळे रोहित परमेश्वर चव्हाण (वय २०) या तरूणाने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. तिला वाचविण्याच्या नादात रोहित स्वतःही बुडाला. काही तरुणांनी या दोघांनाही वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघांचाही बुडून मृत्यू झाला.