बीड : धारूर-केज रोडवर बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार | पुढारी

बीड : धारूर-केज रोडवर बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

धारूर; पुढारी वृत्तसेवा : खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील धारूर-केज रस्त्यावर एसटी बस व मोटरसायकलचा अपघात होऊन मैंदवाडी येथील एकाचा जागीच मृत्यू झाला.

खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील धारूर-केज रस्त्यावर धारूर शहरापासून काही अंतरावर दुपारी दोन वाजताच्या सुमारास मैदवाडी येथील चंद्रकांत भगवान मैद (वय ४८) हे दुचाकीवरून (वाहन क्र. एम एच 44 जे 9207) धारूर येथे आपले काम उरकून मैदवाडी गावाकडे जात होते. दरम्यान कळंब-माजलगाव बस (वाहन क्र. एम एच 14 बी टी 25 34) कळंबकडून माजलगावकडे जात असताना धारूर केज रस्त्यावर समोरासमोर अपघात होऊन मैंदवाडी येथील चंद्रकांत मैद बसच्या खाली येऊन जागीच मृत्यू झाला आहे. धारूर पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती समजताच अपघातस्थळी पोलिसांनी धाव घेतली. पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोविंद बासटे तपास करत आहेत. या घटनेने मैदवाडी गावांमध्ये शोककळा पसरली आहे पसरली आहे .

Back to top button