

मंठा; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू करून आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मंठा तालुक्यात तिरडी यात्रा आंदोलन करण्यात आले.
मंठा तालुक्यातील गेवराई येथे राज्य सरकारच्या प्रतीकात्मक फोटो तिरडी यात्रा आंदोलन करून दहन करण्यात आले.यावेळी दत्ता खरात , भागवत गोंडगे, ज्ञानेश्वर गोंडगे, प्रसाद खरात , किरण काकडे, भारत काकडे, विलास गोंडगे, आकाश गोंडगे, अविनाश खरात, विजय गोंडगे, अक्षय खरात , इंद्रजित खरात ,बालाजी खरात , दिलिप खरात ,आदित्य खरात , प्रजवल खरात, विशाल खरात , प्रदीप गोंडगे , जालिंदर गोंडगे, विचिष्ठ खरात , नारायण खरात , पवन खरात यांच्यासह गेवराई येथीव सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.