अंबाजोगाईच्या पिंपरी येथे ५० जणांना नगरभोजनातून विषबाधा

35 जणांना स्वा रा ती तर 15 जणांना लातूरच्या रुग्णालयात केले दाखल
Sangli food poisoning
अंबाजोगाईच्या पिंपरी येथे ५० जणांना नगरभोजनातून विषबाधाFile Photo
Published on
Updated on

अंबाजोगाई / गोविंद खरटमोल

अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर जवळील पिंपरी येथील नगर भोजनाच्या कार्यक्रमातुन जवळपास 50 जणांना अन्नातून विषबाधा झाली आहे. विषबाधा झालेल्या रुग्णांना अंबाजोगाई तसेच लातूर येथे हलवण्यात आले आहे. तर काहींवर घाटनांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.

Sangli food poisoning
Gevrai news : बागपिपळगावात चोरट्यांनी शेतकऱ्याचे घर फोडले, ५० हजाराचा मुद्देमाल चोरीला

पिंपरी येथे नगरभोजनाचा कार्यक्रम सुरू असून, पंधरा दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात आठवड्यातुन दोन वेळा गावकऱ्यांना नगरभोजन दिले जात आहे. 800 जणांचे जेवण तयार करण्यात आले होते. यातील 50 जणांना मळमळ व उलट्यांचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

50 रुग्णांपैकी 35 जण अंबाजोगाई तर लातूर येथे 15 जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालासाहेब लोमटे यांनी घटनास्थळी तसेच अंबाजोगाई येथील स्वा रा ती तसेच घाटनांदूर येथील रुग्णालयास भेट दिली.

Sangli food poisoning
Beed Crime News | परळीतील एका नागरिकाचे भररस्‍त्‍यातून अपहरण, पाच ते सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल

पिंपरी येथील जेवनातील अन्नाचे नमुने लातूर येथील प्रयोगशाळेत पाठवले आहेत. प्रयोगशाळेतील अहवाल आल्यानंतरच विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होईल असे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news