Dharur Missing Girl | गोपाळपूर येथील १७ वर्षीय मुलगी बेपत्ता

धारूर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद
  missing case
गोपाळपूर येथून 17 वर्षीय मुलगी बेपत्ताFile Photo
Published on
Updated on

Gopalpur missing girl

धारूर : धारूर तालुक्यातील गोपाळपूर येथील किसन मोतीराम महुरे (वय ५५) यांनी आपली मुलगी सोनू किसन महुरे (वय १७) हिच्या बेपत्ता झाल्याची फिर्याद धारूर पोलिस ठाण्यात दिली आहे.

महुरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ८ वाजता संपूर्ण कुटुंबाने एकत्र जेवण केले. त्यानंतर रात्री ८.३० वाजता मुलगी सोनूने “मी गंगाबाई काकूंच्या घरी जाते” असे सांगून घराबाहेर पडली. मात्र बराच वेळ झाला तरी ती परत आली नाही.कुटुंबीयांनी गंगाबाई हनुमंत मुंडे यांना विचारले असता त्यांनी सोनू त्यांच्या घरी न आल्याचे सांगितले. त्यानंतर महुरे व त्यांच्या मुलगा बाबासाहेब यांनी नातेवाईकांच्या मदतीने परिसरात तसेच धारूर, केज परिसरात शोध घेतला. परंतु सोनूचा काहीच मागमूस लागला नाही.

  missing case
OBC Maha Melava : बीड येथील ओबीसींचा महामेळावा स्थगित

शेवटी किसन महुरे यांनी धारूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी मुलगी सोनू हिला पळवून नेल्याची शंका व्यक्त केली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news